आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी नामनिर्देश पत्राची छाननी होणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 करिता नामनिर्देशन पत्राची छाननी आज दिनांक 18/11/2025 रोजी सकाळी 11.00 वाजले पासून छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंढरपूर नगरपरिषद मध्ये खाली नमुद केलेल्या वेळापत्रका नुसार प्रभाग निहाय होणार आहे.
तरी छाननीसाठी उमेदवार, उमेदवाराचा एक सुचक आणि उमेदवाराने लेखी प्राधिकृत केलेला एक व्यक्ती यांनाच उपस्थित राहता येईल या व्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
नगराध्यक्ष व प्रभाग क्र. 1 सकाळी 11.00 प्रभाग क्र.2 सकाळी 11.30प्रभाग क्र.3 व 4 सकाळी 12.05 प्रभाग क्र. 5 व 6 दुपारी 1.00 प्रभाग क्र. 7 व 8 दुपारी 1.30 प्रभाग क्र.9 व 10दुपारी 2.00 प्रभाग क्र. 11 व 12 दुपारी 3.00 प्रभाग क्र. 13 व 14दुपारी 3.30 प्रभाग क्र. 15 व 16 दुपारी 4.00 प्रभाग क्र. 17 व 18 सांय 4.30
छाननीसाठी नामनिर्देशन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या मुळप्रतिसह उपस्थित रहावे. असे डॉ. सीमा होळकर निवडणूक निर्णय अधिकारी, पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 यांनी केले आहे.

