आमसभेत पंढरपूर शहरातील प्रश्नांची चर्चा होणे चुकीचे परिचारक समर्थकांचा आरोप
आ. प्रशांतराव परिचारक यांच्या विरोधातील टीका खपवून घेतली जाणार नाही समर्थकांचा इशारा


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-नुकतीच पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थांची आमसभा आ. अभिजित पाटील माढा, यांचे अध्यक्षतेखाली व आ. समाधान आवताडे, पंढरपूर मंगळवेढा, आ. राजु खरे मोहोळ, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे उपस्थितीत झाली.
यावेळी पंढरपूर नगरपालिका हद्दीतील चर्चा सुरु करुन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचेवर टीका करण्यात आल्याने परिचारक समर्थक नाराज झाल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. अभिजित पाटील व आ. राजु खरे यांचेवर आपली नाराजी व्यक्त करुन परिचारक अल्पसंख्यांक असले मुळे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केले जात आहे. आम्ही खंबीरपने परिचारका सोबत आहोत अशी भूमिका व्यक्त केली.
या आमसभेत पंढरपूर शहराचे प्रश्नांची चर्चा होणे चुकीचे असल्याचा परिचारक समर्थकांनी आरोप करुन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या विरोधातील टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. या वेळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पुढील माहिती देण्यात आली.
१. आमसभा पंचायत समिती कार्यक्षेत्रामधील नागरीकांसाठी असते, नगरपालीका कार्यक्षेत्रातील स्वतःच्या कार्यकर्त्यांना बोलावून ग्रामीण प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले.मुख्याधिकारी यांना विनाकारण वेठीस धरले.
२. पढरपूर शहरातील प्रश्नासाठी नगरपालीका सर्वसाधारण सभा असते.
३. परीचारक यांच्या नावाचा उल्लेख करून स्वतःचे महत्व वाढविले.
४. पंढरपूर शहरामध्ये १३ रस्ते कॉकीट व डांबरीकरण चालू आहे १३० कोटी.
५. अधिकारी यांना अरे-तुरे स्वतःच्या सालगड्या प्रमाणे बोलणे लोकांना पटले नाही.
६. अधिकाऱ्यांमध्ये, महिला अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
७. यापुर्वी आम्ही १५-२० आमसभांना हजर होतो परिचारक, गणपतराव देशमुख, भालके नाना, यशवंत भाऊ यांची पध्दती आम्ही पाहिली आहे.
८. रात्री १२ वाजे पर्यंत सभा होवून फलीत काय ?
मुलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष
१. निरा-उजवा कालवा पाणी२. उजनीचे पाण्याचे नियोजन
३. आरोग्य, शिक्षण४. उसदर ५. खरे आमदारांनी स्वतःच्या घराकडे रस्ता मंजुरी करून घेतला
६. खरे आमदार तुम्ही एवढीच ५ वर्षे आमदार आहात मालक ते मालकच आहे. त्यांची मालकशाही संपवायला तुम्ही निघाले म्हणजे सुर्यावर थुंकण्या सारखे आहे.
७. शहर बोलावावयाचे होते तर आवताडे आमदार अध्यक्ष पाहीजे होते तुम्ही कसे ?
आदी प्रश्न पत्रकाद्वारे विचारण्यात आले आहेत.
यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती, प्रशांत देशमुख, .कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड, माजी सभापती लक्ष्मण धनवडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, किसान सेनाचे माऊली हळणकर, , तानाजी वाघमोडे, पंडित भोसले, अनिल अभंगराव,सर, सुभाष मस्के, राजु गावडे, अरुण घोलप,प्राजक्ता बेणारे,बीजेपी शहराध्यक्ष विक्रम सिरसाट, विश्रांती भूसनर आदी उपस्थित होते.



