डॉ.वामन साळवे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

नाशिक येथे डॉ.वामन साळवे यांना महाराष्ट्र गौरव सन्मान २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला . प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम खुणे, सिनेअभिनेत्री अंजली आकळे, डॉ.इशिका सुर्यवंशी, संस्था अध्यक्ष श्रीमंत बागल महाराज व इतर मान्यवर.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
नाशिक :-येथील सुप्रिम ह्यूमन राइट्स इंटेलिजन्स इंडिया संस्थेचे वतीने मिलिंद कला महाविद्यालयाचे( संभाजी नगर) माजी विद्यार्थी प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा २ मार्च २०२५ रोजी दुपारी श्री. स्वामी नारायण मंदिर, पंचवटी , नाशिक येथे हा सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ नाट्य कलावंत पद्मश्री .परशुराम खुणे (गडचिरोली), सिनेअभिनेत्री अंजली आकळे, व डॉ.इशिका सूर्यवंशी, संस्था अध्यक्ष श्रीमंत बागल महाराज यांच्या हस्ते डॉ. वामन साळवे यांना महाराष्ट्र गौरव सन्मान २०२५ पुरस्कार संस्थेचे गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमास चित्रपट निर्माते भरत जोशी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अनीलभाऊ आहेर, विजय कुमार डीगगे, साप्ताहिक पक्षप्रमुख चे संपादक ज्ञानेश्वर सुरासे आदी मान्यवर उपस्थित होते.