Uncategorized

डॉ.क्षितिजा कदम पाटील यांची भारत होमिओपॅथीक असोसिएशन महिला विभाग  जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर:- येथील डॉ. क्षितिजा राहुल कदम पाटील यांची भारत होमिओपॅथीक असोसिएशन  महिला विभागाच्या सोलापूर  जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती  करण्यात आली असल्याचे पत्र संघटनेने दिले आहे.

होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रातील  निष्ठा, कार्यतत्परता व समाजसेवेतील योगदान लक्षात घेवून ही नियुक्ती करण्यात येत आहे. असे पत्रात नमूद केले असून आपण संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता, महिला डॉक्टरांच्या प्रगतीसाठी व समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे. आपली ही नियुक्ती पुढील आदेशापर्यंत वैध राहील. असे पत्रकात म्हटले आहे.

डॉ. विद्या नाईकनवरे राज्य महिला अध्यक्ष, भारत होमिओपॅथीक असोसिएश डॉ. गौरव सुनिल सोनवणे संस्थापक अध्यक्ष भारत होमिओपॅधीक असोसिएशन यांच्या सह्या आहेत..

 

त्यांच्या निवडी बद्दल एडवोकेट  विकास भोसले  अध्यक्ष बार असोसिएशन पंढरपूर, एडवोकेट अखिलेश वेळापूर,  फुले शाहू आंबेडकर विचार मंच चे अध्यक्ष सुनील वाघमारे, जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे, एडवोकेट तुषार खडतरे यांनी डॉक्टर क्षितिजा कदम यांचा सत्कार करून अभिनंदन केले पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आपल्याला गनःपूर्वक अगिनंदन व हार्दिक शुभेच्छा!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close