

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुल चिंचोली प्रशाले मध्ये फुले शाहू आंबेडकर विचार मंच ,पंढरपूर यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी राजेंद्र पाराध्ये सर( मा. प्राचार्य विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपुर) तसेच माननीय दादासाहेब दोडके सर माजी मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर) यांनी संविधानाची प्रत प्रशालेत भेट दिली व संविधानाविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. संविधानाची कलमे यांचा अभ्यास करून त्याचा व्यवहारांमध्ये उपयोग करावा असे सांगितले संविधानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. संविधानाची प्रत प्रशालेस भेट दिल्याबद्दल प्रशालेचे संचालक वीरसेन (बापू) देशमुख यांनी त्यांचे आभार मानले प्रशालेचे मुख्याध्यापक नागटिळक सर यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.



