वाचनामुळे प्रगतीच्या उच्च शिखरावर जाता येते:डॉ. राजेंद्र वडजे


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांना व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता प्रेरणा मिळावी तसेच वाचनाचे महत्व जाणून देण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रंथालयामार्फत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर तसेच विद्यार्थी ही उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली. त्यांच्या जंयती निमित्त प्रमुख पाहुणांचे भाषण श्री डॉ. राजेंद्र वडजे सर (सोलापूर विद्यापिठ सोलापूर एन एस एस चे संचालक) त्यांनी आपल्या भाषणात वाचन केल्याने ज्ञानात भर पडते हे महत्व विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितले राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील त्याग, समर्पण भाव इत्यादी गोष्टी सगितले त्यानंतर प्रा. संतोष गवळी सर यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यानी आपल्या भाषणामध्ये वाचन केल्याने जीवनात सकारत्मक बदल घडतात व त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन करण्याचे अव्हान केले, डॉ. व्हटकर. एस यांनी आभार मानले, व या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जवळगीकर एस. एस यांनी केले प्रस्तावना डॉ. सुरवसे वाय.जी. यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री लोंढे केशव यांनी परिश्रम घेतले. तसेच डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जंयती निमित्त आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनचे आयोजन केले होते. ग्रंथालयाकडून भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनातील ग्रंथांचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
यांच्या दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन‘ या कार्यक्रमास वाचकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अरूण मित्रगोत्री सर प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थीगण मोठ्या प्रमाणात होते तसेच भानुदास घंदुरे, शहाजी जाधव, महेश ढेगळे, आलकुंटे, संजू थीटे उपस्थित होते



