लोक कलावंत दिवंगत देविदास बंगाळे व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत धनाजी शिवपालक यांचा” मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार “त्यांचे कुटुंबाला देऊन गौरव
सा. जोशाबा टाईम्सच्या वतीने घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मान्यवारांचे हस्ते केला सन्मान


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल-
श्रीकांत कसबे

दिवंगत देविदास बंगाळे

दिवंगत धनाजी शिवपालक
पंढरपूर :-सा. जोशाबा टाईम्स सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार लोक कलावंत दिवंगत देविदास बंगाळे अजनसोंड तालुका पंढरपूर व सामाजिक कार्यकर्ते दिवंगत धनाजी शिवपालक उंबरे पागे तालुका पंढरपूर यांना जाहीर करण्यात आला होता.त्यांचे वितरण जोशाबा टाईम च्या वर्धापन दिनानिमित्त 28 सप्टेंबर रोजी होणार होते परंतु तुफान पाऊस झाल्याने व जिल्हाधिकारी यांनी रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे त्यांचे कुटुंबातील कोणीही उपस्थित राहू शकले नव्हते.त्यामुळे त्यांचे कुटुंबातील व्यक्तीला जोशाबा टाइम्सच्या टीमने घरी जाऊन सन्मानित केले.

दिवंगत धनाजी शिवपालक यांच्या पत्नी श्रीमती मनीषाताई शिवपालक व त्यांची मुले यांचा सन्मान पुरंदावडे ता. माळशिरस येथे जाऊन जेष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे सर यांचे हस्ते करण्यात आला. सन्मानपत्र, ट्रॉफी बुफे, शाल देऊन गौरविण्यात आले. सोबत श्रीकांत कसबे, जोशाबा ग्रुपचे सदस्य सुनील वाघमारे, अंबादास वायदंडे

दिवंगत देविदास बंगाळे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीताई बंगाळे व त्यांची मुले यांचा सन्मान विटे ता. पंढरपूर येथे जाऊन मा. दादासाहेब दोडके सर माजी (मुख्याध्यापक गौतम विद्यालय) पंढरपूर यांचे हस्ते करण्यात आला. सन्मानपत्र, ट्रॉफी बुफे, शाल देऊन गौरविण्यात आले. सोबत श्रीकांत कसबे, जोशाबा ग्रुपचे सदस्य सुनील वाघमारे,



