Uncategorized

संविधान विरोधी वकील राकेश तिवारी वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सरन्यायाधीश भूषण गवई  यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी विषमताग्रस्त व्यक्तीवर कडक कारवाईची फुले शाहू आंबेडकर विचार मंचाची मागणी 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-दि. ६/१०/२०२५ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयांचे मुख्यन्यायाधिश . बी. आर. गवई  यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न मनुवादी प्रवृक्तीच्या वकीलाने केलेला आहे. सदरचा प्रकार हा पूर्वनियोजित कट करून जाणीवपूर्वक व्यवस्थेवर केलेला प्रहार आहे. भारतीय नागरिक, सरकार, कार्यपालिका कोणाकडून‌ही अन्याय झाला तर ज्या न्यायपालिकेचा सामान्य माणसाला शेवटी आधार न्यायपालिकेचा असतो. अशा न्यायव्यवस्थेवर, भारतीय संविधानावर व लोकशाही मुल्य समता, स्वातंत्र्य बंधुता व न्यायावर जातग्रस्त व धर्मग्रस्त   सनातन धर्मी वकील राकेश किशोर तिवारी याचे वर्तनाबाबत त्याचेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच जातीय व्देशाने केलेल्या टिपण्णीबाबत ॲट्रॉसिटी  ऍक्ट  कलमानुसार गुन्हा  दाखल होवून कारवाई व्हावी,   अशा प्रकारची मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार सचिन लंगुटे   पंढरपूर यांच्याकडे फुले शाहू आंबेडकर विचार मंच व इतर संविधान प्रेमी लोकशाही प्रेमी, पुरोगामी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली असून सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

या निवेदनावर अध्यक्ष सुनील वाघमारे, उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे,फुले शाहू आंबेडकर विचारमंच पंढरपूर.अप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, दीपक चंदनशिवे, ऍड. रोहित एकमल्ली ,  एल एस सोनकांबळे,श्रीकांत कसबे, राजेंद्र पाराध्ये सर, दादासाहेब दोडके,सर, सिकंदर ढवळे सर, जितेंद्र आठवले, राहुल सर्व गोड, बा.ना धांडोरे, ऍड. अखिलेश वेळापुरे, सचिन भंडारे ऍड.तुषार खडतरे राजू बनसोडे,प्रा. शिवाजी वाघमारे,सर व्ही एस कांबळे सर, सतीश तुपारे, संतोष ननवरे,तानाजी आगवणे,सुधाकर मस्के  कालिदास गवळी,मोहन मस्के आदींच्या सह्या आहेत.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close