Uncategorized

माझे विद्यार्थी माझा अभिमान:सुनील अडगळे

प्रतीक्षा माळी, व महेश माळी या विध्यार्थ्यांनी मिळविले लक्षणीय यश

प्रतीक्षा भारत माळी

महेश नवनाथ माळी

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल 

 संपादक -श्रीकांत कसबे

पंढरपूर :-अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी ज्याप्रमाणे स्वतःला शेतीच्या मातीत गाडून घेऊन काम केल्यासारखे कष्ट करतो… त्याप्रमाणे रानमळा वस्तीसारख्या छोट्याशा वस्तीवरील कष्टकऱ्यांच्या आयुष्यात सुख,समाधान मिळावे म्हणून वेड्यासारखं झपाटून अनंत अडचणी आल्या.. तरी काळ आणि वेळेचे भान हरपून अविरतपणे झटत राहिलो‌ आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या यशाचा एक छोटासा भाग झालो.. हा आनंद अविस्मरणीय आहे. अशी भावना   जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे  भोसे येथील सहशिक्षक सुनील अडगळे यांनी व्यक्त केल्या.

त्यांची विद्यार्थीनी प्रतीक्षा भारत माळी यांना भारतीय संशोधन विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करताना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाच्या वतीने सुवर्णपदक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला

तर विध्यार्थी महेश नवनाथ माळी
भोसे रानमळा याची अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये UsA selection for cuAv expo and Al Bootca..या पदासाठी निवड झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेतुन पुणे आगमन  झाल्यानंतर जल्लोषात स्वागत.करण्यात आले. यावेळी शिक्षक म्हणुन त्यांना फार आनंद झाला. यावेळी या भावना व्यक्त केल्या.

जिल्हा परिषदेच्या छोट्याशा वाडी वस्तीवरील शाळेत असे विद्यार्थी घडणे म्हणजे रानमळा आणि भोसे भागाचा हा सुवर्ण काळ आहे

. यासाठी पालक, आपणासारख्या सर्वांनी, माता-भगिनी,ग्रामस्थ आणि शिक्षण विभागाने दिलेली साथ अवर्णनीय आहे. आपल्या ग्रामीण भागातील हे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र राज्याचे आणि भारताचे नाव गाजवत आहेत.. पंचक्रोशी, पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यासाठी हा फार मोठा अभिमान आहे…असीही भावना त्यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close