महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग कर्करोग जनजागृती मोहीम संपन्न


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग कर्करोग जनजागृती मोहीम अंतर्गत कॅन्सर निदान वॅन चे पंढरपूर तालुक्यात आगमन त्या निमित्ताने दिनांक 11 रोजी भाळवणी दिनांक 12 रोजी उपरी व दिनांक 13 रोजी भांडीशेगाव येथे शिबिर आयोजित केले होते व आज दिनांक 14 रोजी वाखरी येथे कॅन्सर निदान वॅन चे आगमन झाले.या शिबिराचे उद्घाटन माननिय आमदार समाधान दादा अवताडे सो यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी डॉ एकनाथ बोधले तालुका आरोग्य अधिकारी,डॉ भिसे ,डॉ स्वाती बोधले व डॉ महेश माने स्त्री रोग व प्रसुती शास्त्र तज्ञ ,डॉ प्रसन्न भातलवंडे व डॉ खुपसुंगीकर मॅडम दंत शल्य चिकित्सक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र गा दे गाव व भाळवणी

वैद्यकिय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी आशा तसेच बहुसंख्येने स्त्रिया व पुरुष लाभार्थी उपस्थित होते. आतापर्यंत 4 गावामध्ये 600 च्या वर लाभार्थी यांची तपासणी केली असून संशयित असणारे मुख कर्करोग ,गर्भाशय मुख कर्करोग व स्तन कर्करोग लाभार्थी यांची पुढील तपासणी ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय ,सामान्य रुग्णालय यांचेमार्फत होणार आहे व अंतिम निदान नंतर त्यांचे उपचाराचे नियोजन करण्यात येणार आहे.तसेच स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत महिलांच्या आरोग्याची तपासणी ही केली जाणार आहे.सदर शिबिरात रक्तदाब मधुमेह तपासणी रक्त लघवी तपासणी व इतर आवश्यक त्या सर्व तपासणीचे नियोजन वॅन मध्ये करण्यात आलेले आहे.

डॉ एकनाथ बोधले म्हणाले की सदर वॅन माध्यमातून कॅन्सर निदान लवकर होण्याकरिता व उपचार होणांकरिता फायदा होत असून अशी सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहचत आहे.लवकर निदान झाल्यास निश्चितच उपचाराने हे आजार पूर्णपणे बरे होतात याचीही माहिती दिली.यावेळी बोलताना आमदार समाधान दादा अवताडे म्हणाले सार्वजनिक आरोग्य विभाग वतीने हा चालू असणारा उपक्रम स्तुत्य असून माननिय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री

यांचाआरोग्याविषयी असणारा दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ असून या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे तसेच सदरची वॅन दिनांक 15 रोजी इसबावी 16 रोजी पंचायत समिती पंढरपूर 17 रोजी आजनसोंड 18 रोजी सुस्टे 19 रोजी फुलचिंचोली येथे असणार आहे तरी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा असेही आवाहन केले.

सदर उपक्रम यशस्वीपणे राबविणे करिता डॉ भगवान पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे,डॉ संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर ,डॉ वर्षा डोईफोडे जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर ,डॉ नंदकिशोर घाडगे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ श्रीकांत कुलकर्णी निवासी वैद्यकीय अधिकारी,डॉ मोहन शेगर सहायक संचालक कुष्ठरोग यांचे मार्गदर्शन लाभले.



