Uncategorized

पंढरपुरातील उपजिल्हा रूग्णालयात कॅन्सर आजारावर  उपचार सुरू करा:श्रीकांत शिंदे

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस  श्रीकांत शिंदे यांची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आहे. तसेच जिल्ह्यात इतर खाजगी हॉस्पिटल आहेत. परंतु सध्याच्या राहणीमानामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याचा विचार करून सामान्य नागरिकांसाठी पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयात कॅन्सर आजारावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सामान्य नागरिकांची सोय होईल. तरी या मागणीचा विचार करून कॅन्सरवर उपचार करणेसाठीची यंत्रणा सुरू करण्यास संबंधितास आदेश द्यावा अशी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील मोठे तिर्थक्षेत्र असून लोकसंख्या ही वरचेवर वाढत आहे त्यात काही कॅन्सर आजाराने त्रस्त नागरिक आहेत त्यांना उपचारासाठी पंढरपुरात सोय नसल्याने बाहेर परगावी उपचारासाठी जावे लागत आहे त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना मानसिक , आर्थिक व शारीरिक त्रास होत आहे त्यामुळे पंढरपुरातील उपजिल्हा कॅन्सरग्रस्त रूग्णावर उपचारांची सोय झाल्यास रूग्णांना व पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close