भ्रष्ट व पदच्युत व्यवस्थापकाला पुन्हा त्या जागेवर अधिकार देणे हे अजिबात मान्य नाही: ह.भ.प. सुहास फडतरे
संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना सोबत घेऊन संत नामदेवाच्या पायरी पासून मंत्रालया पर्यंत आंदोलन करणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूरचे विठ्ठल दैवत हे आम्हा तमाम वारकरी मंडळींचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरावर शासनाची समिती आम्हा वारकरी लोकांच्या सोयीसाठी व सेवेसाठी नियुक्त केलेती असते. पण यामध्येच व्यवस्थापकाने उघड भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. तथाकपित व्यवस्थापकाला समितीने सक्तीच्या रजेवर पाठवले असताना व्यवस्थापक मनोज श्रौत्री यांना पुन्हा मंदिर समितीचा चार्ज दिल्याचे समजते. ज्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठलाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे, जो चोर आहे अशा अधिकाऱ्याला समितीने पुन्हा त्या पदावर बसवले असून हा अक्षम्य गुन्हा समितीने केला आहे. पण भ्रष्टमुक्त समाज व्यवस्थेचे समर्थन केलेल्या व भ्रष्ट घटकाना वठणीवर आणण्याचे काम आमच्या वारकरी संतांनी केले त्याच विचारांचे आम्ही वारकरी निष्ठावान पाईक आहोत. त्यामुळे वारकरी संप्रदायाला अशा भ्रष्ट व पदच्युत व्यवस्थापकाला पुन्हा त्या जागेवर अधिकार देणे हे अजिबात मान्य नाही त्यांना त्या जागी बसवल्यास आम्ही शांत बसणार नाही.असा इशारा ह.भ.प. सुहास नधुराम फडतरे (वारकरी कीर्तनकार, प्रदेशाध्यक्ष नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य) यांनी एका निवेदना द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. हे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी सुनील इतापे यांना देऊन आमच्या भावना त्वरित शासनाला कळवाव्यात व निर्णय घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

शासनाने योग्य निर्णय नाही घेतला तर संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना सोबत घेऊन संत नामदेवाच्या पायरी पासून ते विधी व न्याय मंत्री तथा मुख्यमंत्री यांच्या घरापर्यंत विठोबाचे मंदिर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी दिंडी काढण्यात येणार आहे. या दिडीच्या माध्यमातून विठ्ठलाच्या मंदिरात चाललेला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी भाविकांना सुलभदर्शन मिळण्यासाठी मंदिरात चोऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी झोपलेल्या मंदिर समितीच्या सदस्यांना जागे करण्यासाठी ही दिंडी निघणार आहे. याची दखल आपण घ्यावी आणि संबंधित अधिकारी व समितीवर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात वर उल्लेख केल्या प्रमाणे संविधानिक व वारकरीपद्धतीने आंदोलन छेडले जाईल. पाची दखल घ्यावी
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारीसो सोलापूर ,सहअध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांना दिल्या आहेत

<


