Uncategorized

फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने गौतम विद्यालयास “संविधान” प्रत भेट

संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त सर्व शाळांना संविधान प्रत देण्याचे नियोजन

फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष सुनील वाघमारे यांच्या हस्ते मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांना संविधान प्रत देण्यात आली याप्रसंगी सदस्य माजी प्राचार्य राजेंद्र पारध्ये सर,उपाध्यक्ष ऍड. कीर्तीपाल सर्वगोड, सल्लागार श्रीकांत कसबे, सदस्य व्ही.एस. कांबळे सर सेवागिरी गोसावी, सुखदेव माने

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-भारतीय संविधान अमृत महोत्सवा निमित्त फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने गौतम विद्यालयास “संविधान” प्रत मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांना भेट देण्यात आली. यावेळी विचारमंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे म्हणाले की, पंढरपूर शहर व तालूक्यातील सर्व माध्यमिक शाळेस आम्ही “संविधान “प्रत भेट देणार असून या उपक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे गौतम विद्यालय येथून आम्ही सुरुवात करत आहोत. 26 नोव्हेंबर 25 रोजी पंढरपुरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गौतम विद्यालय ची मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी गौतम विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक व फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे खजिनदार दादासाहेब दोडके सर यांनी प्रास्ताविक भाषणात विचारमंचाची भूमिका स्पष्ट करून या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसपी रूपनर सर यांनी केले. तर आभार गोसावी मॅडम यांनी मानले. वेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे सदस्य विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र पारध्ये सर,उपाध्यक्ष ऍड. कीर्तीपाल सर्वगोड, सल्लागार श्रीकांत कसबे, सदस्य व्ही.एस. कांबळे सर सेवागिरी गोसावी, सुखदेव माने आधी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. वेळी विचार मंचच्या उद्दिष्टाचे पत्रक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वाटण्यात आले.

फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांच्या वतीने विवेकवर्धिनी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला संविधान प्रत भेट

पंढरपूर -भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूरच्या वतीने दिनांक 4 /9 /2025 .रोजी विवेकवर्धिनी विद्यालय व जुनिअर कॉलेज पंढरपूर यांना माननीय किसनराव सर्वदे सर व या विद्यालयाचे माजी प्राचार्य मा.राजेंद्र पाराध्ये सर यांच्या हस्ते माननीय प्राचार्य मुंडे सर यांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली याप्रसंगी गौतम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय दशरथ दोडके सर यांनी भारतीय संविधानाची रचना ,वैशिष्ट्ये व नागरिकांचे कर्तव्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .यावेळी विचारमंचे मार्गदर्शक श्रीकांत कसबे ,सेवागिरी गोसावी, माननीय प्राध्यापक दराडे सर माननीय प्राध्यापक चौगुले सर ,प्राध्यापिका दूधभाते मॅडम उपस्थित होत्या

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close