उपजिल्हा रुग्णालयात एच. आय. व्ही. संसर्गितांसाठी रेशीम गाठी वधु-वर परिचय मेळावा संपन्न


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :दि. १५/८/२०२५ – रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद, सोलापूर, एआरटी सेंटर, पंढरपूर, सोलापूर, बार्शी व एन.एस.ओ.पी.+ समग्र प्रकल्प, पंढपूर-सोलापूर, सर्व आय.सी.टी.सी. केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने एच. आय. व्ही. संसर्गित मुला-मुलीकरिता रेशीम गाठी वधु-वर परिचय मेळावा उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे संपन्न झाला. या परिचय मेळाव्याकरिता महाराष्ट्रातील प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी इच्छुक वधु-वरांची १७७जणांची नोंदणी झाली. या मेळाव्यास इच्छुक वधु वरांबरोबर त्यांचे नातेवाईकांसह ४५० ते ५०० नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर डॉ. दिपक धोत्रे, वैद्यकिय अधिक्षक, उ.जि.रु.पंढरपूर, यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन, तथा डॉ. सयाजीराव गायकवाड, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी, डॉ. प्रदीप केचे, वैद्यकिय अधिकारी, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. बालाजी बिराजदार, डॉ. संभाजी भोसले, डॉ. अविनाश वुईके, डॉ. विनिता कार्यकर्ते, डॉ. खुपसंगिकर, श्री. कृष्णा सकट, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद, सोलापूर, श्री. समाधान माळी, अध्यक्ष, एन.एस. ओ.पी. समग्र प्रकल्प, पंढपूर सोलापूर, यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
प्रस्ताविक मध्ये डॉ. सयाजीराव गायकवाड, व. वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, पंढरपूर यांनी एआरटी सेंटरचे कामकाज व एआरटी औषधोपचारा बाबत सविस्तर माहिती दिली. या मेळाव्याचे आयोजन महत्व गोपनीयतेची काळजी घेऊन इच्छुक वधु-वरांचा सविस्तर परिचय व परस्परांचे विचार विनिमय करिता पुरेसा वेळ व जागा उपलब्ध करुन देऊन जवळपास यापैकी ९ ते १० विवाह जुळवून येण्याची खात्री वाटते. तसेच कुटुंबीयांशी विचार विनिमय करून नजीकच्या काळात अजून ६ ते ७ विवाह जुळवून येऊन एकुण अंदाज १५ विवाह अल्पकालावधीत पुर्णत्वास जातील.
सदरील विवाह सामुदायिक विवाह सोहळयाकरिता प्रोत्साहनसाठी प्रयत्न चालू आहेत.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व परिचय मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दिपक धोत्रे, वैद्यकिय अधिक्षक, उ.जि.रु.पंढरपूर यांनी जोडीदाराचे निवड व महत्व सांगत असताना नियमित एआरटी औषधोपचाराचे महत्व सांगितले व एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांना सर्वोपतरी औषधोपचार व मोफत रुग्णसेवा तसेच विविध शासकीय योजना देणे बाबत सर्वोपतरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. या मेळाव्याचे
आयोजन व उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच इच्छुक वधु-वरांना नवीन जोडीदार निवडण्याबात शुभाशिर्वाद दिले.
या वधू-वर मेळाव्याकरिता अंदाजित ४५० ते ५०० सहभागी सर्व उमेदवार व नातेवाईकांसह नाष्टा व भोजनांची व्यवस्था पंढरपूर येथील सामाजिक संस्था ” पालवी प्रभा-हिरा” प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती मंगलताई शहा यांच्या मार्फत मोफत करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम कदम, समुपदेशक, व आभार प्रदर्शन वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश वुईक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संतोष शेंडगे, बाजीराव नामदे, नागेश देवकर, दिपक गोरे, किशोर जाधव, युवराज वांगी, संदीप देशमुख, एजाज बागवान, भगवंत भोसले, श्रीमती मिनाक्षी कदम, स्वाती कसबे, रुपाली देवकर, सुज्ञाता गायकवाड, राजश्री टकले, मेघा चंदनशिवे, बाळासाहेब पांढरे, धनंजय कुंभार, सुनिल चांदणे, तुकाराम साठे, भारत सोनवले, विशाल शिंदे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.



