Uncategorized

पंढरपूर शहर भय, खड्डा व धूळ मुक्त करणार:डॉ. प्रणिताताई भालके

तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा निवडणूक प्रचाराचा धूमधडक्यात शुभारंभ

जोशाबा टाइम्स  वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- गेली 40 वर्षे सत्ता  सत्ताधाऱ्यांच्या हातात असूनही पंढरपूर शहरात विकासाची कामे झालेली नाहीत. तरीही आम्ही विकास केला म्हणून  हे लोक पुन्हा एकदा लोकांना मते मागून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून खूप हैराण झाले आहेत. कस सगळीकडे खड्डेच खड्डे झाले आहेत. नीट चालता सुद्धा येत नाही. वहाने चालवणे  सुद्धा अवघड होत आहे. अशा लोका विरोधात आवाज उठवला तरी  दहशत निर्माण केली जाते. यामुळे पंढरीतील जनता त्रस्त झाली आहे. पंढरपूर शहर भय मुक्त, खड्डे मुक्त, व धूळ मुक्त करण्यासाठी जनतेतून माझी उमेदवारी आलेली आहे. त्यामुळे मला संधी मिळाली  तर पंढरपुरात निश्चितच परिवर्तन घडवून येईल याची मी ग्वाही देते.

पुढे  बोलताना त्या म्हणाल्या की सत्ताधाऱ्यांनी 40 वर्षात काय काम केले नंतर काय काम करणार आहेत त्याचे विकासाचे नेमके व्हिजन काय आहे यांची समोरासमोर बसून चर्चा करावी मी कधीही तयार आहे. विकासाची दृष्टी माझ्याकडे आहे. जनता माझ्याकडे थेट काम घेऊन येऊ शकते. तेव्हा येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मला व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 35 उमेदवारांना मतदारांनी प्रचंड मताने निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आव्हान त्यांनी केले.


तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने नामदेव महाराज पायरी येथे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (श प) चे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, साईनाथ अभंगराव, भैरवनाथ शुगर चे चेअरमन अनिलदादा सावंत, दिलीपबापू धोत्रे, भगीरथदादा भालके  अॅड. गणेश पाटील,  अॅड.  राजेश भादुले, शौकत  पटेल  यांचे सह 35 उमेदवारसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महाद्वार, कालिकादेवी चौक, काळा मारुती, चौफाळा, शिवाजी चौक महात्मा फुले चौक,भाई भाई चौक लहुजी वस्ताद चौक, महात्मा फुले चौकात रॅलीचे सभेत रूपांतर झाले.


यावेळी मंचकावर अध्यक्षपदाच्या उमेदवारासहित नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी अभ्यासपूर्ण भाषणात विधानसभा सदस्य प्रशांतराव परिचारक पालकमंत्री जीवन गोरे यांच्या टीकेला उत्तर देऊन नगरपालिकेचे उमेदवार निवडण्याचे अधिकार सुद्धा त्यांना दिले नाहीत असा टोला मारला.


यावेळी उमेदवार शिवाजी मस्के, दलित स्वयं सेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, वाल्मीक महासंघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव
व्यकटेश कुलकर्णी,ब्राम्हण महासंघ, प्रा.प्रसाद सातपुते, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मनसेचे राज्य संघटक दिलीपबापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत, यांनी आपले विचार व्यक्त करून नगराध्यक्षपदी प्रणिता भालके व 35 उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवहान केले . सूत्रसंचालन सत्यम धुमाळ यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close