यल्लपा घुले यांना आत्महत्येस प्रवृत्त केली प्रकरणी पंढरपूरातील खाजगी सावकारकी करणाऱ्या डॉक्टर व इतर दोन खाजगी सावकारावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालायचे आदेश

मयत यल्लपा घुले
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-संतपेठ येथे राहणारे फळ विक्रते यल्लपा पांडुरंग घुले यांनी दि 24/4 /2022 रोजी सायंकाळी 7 वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती यल्लपा घुले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टी लिहलेली होती त्यामध्ये डॉ आनंद गायकवाड, विजय शहाणे,सतीश रोकडे या सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे नमुद केलेले होते त्या यानंतर घुले यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पो स्टेशन ला गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही ही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला त्यांनंतर घुले यांच्या कुटुंबीयांनी वरिष्ठांनकडे गुन्हा ची नोंद करण्याची मागणी केली करून ही पोलिसांनी नकार दिल्यावर घुले यांच्या पत्नी अंजना घुले यांनी अँड अमोल देसाई यांच्या मार्फत पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खाजगी सावकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दाखल केली होती अँड अमोल देसाई यांच्या युक्तीवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश एस.अ.साळुंखे मॅडम यांनी डॉक्टर आनंद गायकवाड, विजय शहाणे व सतीश रोकडे यांच्या वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस स्टेशन ला दिले
सदर केस कामी अँड अमोल देसाई,अँड विशाल वाघेला, अँड राजेंद्रप्रसाद पुजारी यांनी काम पाहिले