पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचा ब्याऐंशीवा वाढदिवस संपूर्ण रयत शिक्षण संस्था कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्
महाविद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर व माढा येथील कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुली राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. तरी या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील यांनी केले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “ही स्पर्धा सोमवार दि. बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी सात वाजता संपन्न होणार असून या स्पर्धेत सोळा वर्षावरील स्त्री-पुरुषांना सहभागी होता येणार आहे. ही स्पर्धा पुरुषांसाठी दहा कि.मी. तर स्त्रियांसाठी सहा कि.मी. ची असणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण चोवीस बक्षिसे जाहीर करण्यात आली असून त्यापैकी बारा बक्षिसे ही महिला स्पर्धकांसाठी आहेत. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकासाठी रुपये बारा हजार बारा, दुसऱ्या क्रमांकासाठी रुपये सात हजार बारा, तिसऱ्या क्रमांकासाठी रुपये पाच हजार बारा, चौथ्या क्रमांकासाठी रुपये चार हजार बारा, पाचव्या क्रमांकासाठी रुपये तीन हजार बारा, सहाव्या क्रमांकासाठी रुपये दोन हजार बारा, त्याचबरोबर रुपये एक हजार दोनशे बारा रुपयांची सहा उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात
आली आहेत. अशाच स्वरूपाची बक्षिसे महिला स्पर्धकांसाठी स्वतंत्र ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. मात्र स्पर्धेत भाग घेण्यासाठी https://forms.gle/eNh6hEZTFKcWKVaG6 हा दुवा वापरून ऑनलाईन नावनोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. ९ डिसेंबर सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धकाने स्पर्धेत भाग घेतेवेळी स्वत:चे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.” यावेळी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर व प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे हे ही उपस्थित होते.