वारकरी चरणसेवेत सेवेकरी लीन
जय इस्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक जयंत नायकुडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर:- पंढरपूर वारीत निस्वार्थ भावनेतून ५० हजार वारकऱ्यांची चरण सेवा करणाऱ्या इंदापूर येथील जय इस्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक जयंत नायकुडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी राज्यभरातून निवडक संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये जय इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंगची निवड झाली.
इंदापूर तालुक्यातील सणसर ते पंढरपूर दरम्यान पालखी मार्गावर, संस्थेचे सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी तेल लावून मसाज करत वारकऱ्याची चरण सेवा केली. यावेळी विठ्ठलनामाच्या भक्तिमय वातावरणात विद्याच्यांनी सेवाभावाने कार्य केले. चरण सेवेच्या दरम्यान निमगाव केतकी येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, सहाय्यता निधी कक्ष प्रमुख स्वानंद सोनार, पुणे जिल्हा प्रमुख डॉ. मानसिंग साबळे, सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ. अविनाश खांडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे स्वागत केले. रविठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमच्यासाठी भाग्य होते.
२० वर्षांची सेवाभावाची परंपरा संस्थेकडून कायम
“शासनाकडून आमच्या कामाची दखल घेतली गेल्याचा विशेष आनंद आहे,” असे सानिका फुलारी, तेजस्विनी आठवले आणि प्रथमेश डोंबाळे यांनी सांगितले. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन ऋषिकेश नायकुडे यांनी केले. “आम्ही गेली २० वर्ष वारकऱ्यांची सेवा करत आहोत. यंदा मुख्यमंत्री कार्यालयाच्या विनंतीनुसार पंढरपूरपर्यंत सेवा देण्याची संधी मिळाली. मऊलींची सेवा करताना जणू विठ्ठलच आमच्याशी होते, असे वाटत होते, असे जयंत नायकुडे, संचालक जय इन्स्टटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालय, इंदापूर यांनी सांगितले.



