Uncategorized

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर श्रीसंत मारोती महाराज दस्तापुरकर जीवन गौरव पुरस्काराने  सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर दि.07: श्री संत कीर्तन महर्षी मारोती महाराज दस्तापुरकर यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांना संत मारोती महाराज दस्तापुरकर जीवनगौरव पुरस्कार एका विशेष समारंभात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गाथा महर्षी हरिभक्त परायण रामभाऊ महाराज राऊत व ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 07 जुलै रोजी हा गौरव संपन्न झाला.
वारकरी संप्रदायात अलौकिक अध्यात्मिक कार्य केलेल्या महान संताच्या नावाने औसेकर महाराजांना दिलेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यापूर्वी देखील त्यांना वेदवेदांती, धर्मभास्कर, गुरूचरण कमल चंचरिका पुरस्कार, वीर सिंहासन, मानवधर्म प्रचार, सिध्दरत्न, पं. मदनगोपालजी व्यास, वि.स.पागे, हिन्दुत्व के आधारस्तंभ, महाराष्ट्र भूषण, समाजप्रबोधन, आदर्श समाजसेवक, समाजरत्न, स्वामीचरण, वारकरी, सैनिक मित्र, महाराष्ट्र रत्न, मानवसेवा, शनीरत्न अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close