Uncategorized

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु

छायाचित्रः-स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु
स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध
पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि.१५ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोमवार, दि.१५ जुलै २०२४ ते गुरुवार, दि.२५ जुलै २०२७ रोजी सायं. ०५ वाजेपर्यंत चालणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन (कॅप) रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया सोमवार, दि.१५ जुलै २०२४ ते गुरुवार, दि.२५ जुलै २०२७ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि कन्फर्मेशन करणे आदी प्रक्रिया चालतील. रजिस्ट्रेशन करण्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-१०००/- रु.आणि इतर प्रवर्ग-८००/- रु.असे आहे. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी)च्या प्रवेशाचा लाभ डिप्लोमा (पदविका) इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी)च्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा.नं.-९५९५९२११५४) व प्रा. पोपट आसबे (मोबा.नं.-७८२१००४६४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्रः-स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी चिन्ह व प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close