Uncategorized

खर्डी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

खर्डी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

पंढरपूर:- (अमोल कुलकर्णी )विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित व्हावे आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी खर्डी ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे.

जागृत बहुउद्देशिय सामाजिक संस्था जागृत परिवार व समस्त खर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलै २०२६ रोजी खर्डी येथील पंचकट्टा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

शिक्षणतज्ज्ञ  सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणे, NEET व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

याबतचे निवेदन यापूर्वीच तहसीलदार पंढरपूर व पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश चंदनशिवे उपाध्यक्ष ऍड.मोहन रोंगे, सचिव स्वप्निल नकाते उपस्थित होते.अप्पा रोंगे सर म्हणाले, “हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”

या उपोषणात जागृत ग्रुपचे सुमारे ५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. खर्डीतील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी भेट देऊन नैतिक पाठिंबा दर्शविला. उपोषणस्थळी महापुरुषांच्या विचारांची पुस्तकेही ठेवण्यात आली होती.

आयोजकांनी संपूर्ण उपोषण शांततापूर्ण व कायद्याचे पालन करून पार पाडल्याचे सांगितले असून, विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली.

फोटो ओळी आंदोलन स्थळी जमलेले तरुण छाया कटाक्ष खर्डी

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close