Uncategorized
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चांदीचा मुकुट अर्पण,


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर दि.27, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी विश्व मित्र साई कंट्रक्शन लातूर येथील भाविकांनी सुमारे 1 किलो 95 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार भाविक यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. या चांदीच्या मुकुटाची अंदाजे 1 लक्ष 7 हजार इतकी किंमत होत आहे.



