Uncategorized

प्रचाराची रणधुमाळी संपली… आज नागरिक मतादानाचा अधिकार बजावणार!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :- गेली पाच-सहा दिवस सुरु असलेला पंढरपूर नगर पालिकेच्या  निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा आता संपला असून शहरातील नागरिक आज सकाळपासून आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्याला हवे असणारे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून देणार आहेत. गेली 40 वर्षेb अपवाद वगळता नगरपालिकेची सत्ता परिचारक परिवाराच्या ताब्यात आहे. प्रशांतराव परिचारक यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडी वतीने आपल्या नगराध्यक्षपदाचे शामलताई शिरसाट व 35 नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत.

भगीरथ दादा भालके यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी डॉ.प्रणिताताई भालके यांचे सह 35 नगरसेवक उभे केले आहेत.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीला राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी पाठिंबा देऊन प्रचार प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून 12 नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा केलेले आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अध्यक्ष राजू शिंदे यांनी त्यांच्या पत्नी भारती शिंदे यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे केले असून त्यांनीही होम टू होम प्रचार केला आहे.

सताधारी व विरोधकाच्या वतीने भव्य रॅली, कॉर्नर सभा, शिवतीर्थावरील जाहीर सभा, प्रभागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे,एकमेकावर आरोपाच्या फेरी झाडणे. आरोपाला प्रत्युत्तर देणे याचा धुराळा गेली चार-पाच दिवस उठला होता तो शांत झाला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी विधान परिषद सदस्य प्रशांतराव परिचारक, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे उमेशराव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, युवक नेते प्रणव परिचारक, यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
तीर्थक्षेत्र विकास आघाडी डॉक्टर प्रणिता ताई भालके, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत, विठ्ठल परिवाराचे एडवोकेट गणेश पाटील, शिवसेना शिंदे गटाचे साईनाथ अभंगराव,महेश साठे शिवसेना उबाठाचे संभाजीराजे शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मोहम्मद उस्ताद त्यांनी प्रचारात सहभाग नोंदविला.
श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने चेअरमन अभिजीत आबा पाटील आपल्या बारा उमेदवाराचा प्रचार केला.
लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात शहरातील सर्व मतदार बांधव सामाजिक जबाबदारी म्हणून सहभागी झालेले आहेत. प्रत्येक नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून संविधानाने दिलेल्या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले पवित्र मत देऊन आपला प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तरच लोकशाही जिवंत राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close