सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्र व होलार समाज विकास प्रतिष्ठान कार्यालयाचे 10 फेब्रुवारीला उद्घाटन


सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्र व होलार समाज विकास प्रतिष्ठान
कार्यालयाचे 10 फेब्रुवारीला उद्घाटन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-होलार समाज विकास प्रतिष्ठान गेल्या ९ वर्षापासून होलार समाजातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांवर रचनात्मक काम करत आहे. समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संविधानिक मूल्यांच्या आधारे समाजात हस्तक्षेप करत आहे. संस्था सध्या डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या सहाय्याने सांगोला, आटपाडी आणि माण तालुक्यातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवरील अभ्यास करत असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गावपातळीवर काम करत आहे. संस्था नव्यानेच पंढरपूर या ठिकाणी संस्थेचे कार्यालय आणि सामाजिक सुरक्षा सुविधा केंद्र सुरु करत असून या माध्यमातून समाजामध्ये विविध पातळीवर जाणीव जागृती करण्याचे काम केले जाणार आहे. दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्लॉट न. ११, प्रतिभाताई नगर, टाकळी रोड, पंढरपूर या ठिकाणी दोन्ही कार्यालयांचा उदघाटन सोहळा आयोजित केला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
.उदघाट्न सुशील संसारे साहेब (गट विकास अधिकारी, पंढरपूर) यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर ठोकळे (अध्यक्ष, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था) हॆ असणार आहेत. यावेळी ललित बाबर(सामाजिक कार्यकर्ते)वंदना सोनावले(प.स. सांगोला). बापूसाहेब ठोकळे (सामाजिक कार्यकर्ते)बबन जावीर(अध्यक्ष, होलार समाज विकास प्रतिष्ठान)नाधन केंगार(उपाध्यक्ष, होलार समाज विकास प्रतिष्ठान)दादासाहेब केंगार(खजिनदार, होलार समाज विकास प्रतिष्ठान)नंदकुमार हातीकर(सचिव, होलार समाज विकास प्रतिष्ठान)बा.ना. धांडोरे(जेष्ठ साहित्यिक ) गौतम सरतापे(सदस्य, आंबेडकर संस्था) जयश्री केंगार(होलार समाज विकास प्रतिष्ठान) रावसाहेब कांबळे (सदस्य, आंबेडकर संस्था) हॆ मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.डॉ. अजित केंगार, सुखदेव गुळीग, विद्याताई ढोबळे, रोहित जावीर, आनंदराव ऐवळे, संतोष जाधव, मकरंद केंगार, अॅड निषाद जावीर, अमित केंगार, तुकाराम ऐवळे (जत), उत्तम जावीर सर, रामचंद्र केंगार (सांगोला), सुनिल ऐवळे (पंढरपूर), राजाभाऊ केंगार (पंढरपूर). पिंटू ऐवळे (आटपाडी), गणेश केंगार, मोहन पारसे (माळशिरस), प्रतिक जावीर, अनिषा जावीर, आप्पासाहेब जावीर, महादेव पारसे आदिनी केले असून अधिक माहितीसाठी ९६०४६४६९६३ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.



