पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्ष डोकेदुखी ठरणार….
.. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार….
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनिधी…… पंढरपूर मंगळवेढा विधानसभा च्या निवडणूकी च्या रणधुमाळी काग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रस्तापित राजकीय पक्षाच्या ओढाचढीच्या स्पर्धेत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा आपल्या पारंपारिक मतदार आणि एकगठ्ठा मतदान म्हणून ओळखला जाणारा मतदार यांच्या पाठींबा वर या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात भाजपा, व अन्य राजकिय पक्षाना डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र सध्या या मतदार संघात दिसून येत आहे.
महादेव जानकराना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बेधडक, सडेतोड भूमिकेमुळे ओळखला जातो. याच रासपा पक्षाच्या वतीने पंकज देवकते या उमद्या, प्रामाणिक आणि सर्वसामान्याच्या, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांच्या न्यायहक्का साठी सातत्याने संघर्ष करणारा तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
पंकज देवकते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी पासून या मतदार संघामधून आपला संपर्क ठेवलेला असल्यामुळे त्यांना या मतदारसंघात वाढता पाठींबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या निवडणूक मधील सर्वच पक्षाचे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरते की काय असे जाणवू लागले आहे.
तरुण युवक हे नवमतदार यांची संख्या या मतदार संघात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व शेतकऱ्यांसाठी अनेक अदोलन ते सातत्याने करीत असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांच्या गळ्यातील पंकज देवकते हे ताईत बनले आहेत.
या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पंचरंगी निवडणुकीत रासपा चे उमेदवार आपल्या एकगठ्ठा मताच्या जोरावर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना जेरीस आणतात की काय अशी राजकीय परिस्थिती ही या मतदार संघात निर्माण झाली आहे.
एवढे मात्र निश्चित रासप उमेदवार हा सत्ताधारी व विरोधी पक्षाला डोकेदुखी ठरणार.