राज्यात शरद पवार विरुद्ध मोदी अशी निवडणूक : आमदार रोहित पवार
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माढ्याचा विकास करण्यासाठी साथ द्या : अभिजीत पाटील
अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ भोसे आणि मोडनिंब येथे जाहीर सभा संपन्न
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर /प्रतिनिधी :-माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मोडनिंब येथे आमदार रोहित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की सत्ताधारी सरकार महाराष्ट्राचे नाहीतर गुजरातच्या हिताचे काम करत आहे.
महाराष्ट्राचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी पवार साहेब लढत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पवार विरुद्ध मोदी अशी आहे.
भोसे ते फोनवरून रोहित पवार यांनी संपर्क जाहीर सभेत साधून म्हणले की पवार साहेब आणि भोसे गावचे वेगळे नातं आहे जेव्हा जेव्हा पवार साहेब पंढरपूर तालुक्याचा विषय घेतात तेव्हा आग्रह आग्रहाने भोसे गावाचा विषय सांगत असतात स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील आणि कोरोनाच्या काळामध्ये स्वर्गीय राजू बापू पाटील यांचे दुःखद निधन झालं परंतु पवार साहेबांना सर्वजण सोडून जात होते त्यात मात्र पाटील परिवार नेहमी दोन पिढ्यापासून पवार साहेबांसोबत ताकतीने मागे उभा राहिला परंतु आजची पिढी ही भरकट चाललेली दिसत आहे त्यांना योग्य ती दिशा सांगितली तरी ऐकत नसली तरी येथील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि येथील जनताच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत ठामपणे उभा राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
राज्यात महाविकास आघाडी सरकारला जनतेचे मोठे पाठबळ मिळत असल्याने महाविकास आघाडीचे १८० आमदार निवडून येतील आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की येथील गर्दी पाहून या ठिकाणी पवार साहेबांनी जो उमेदवार दिला आहे. तो निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत अभिजीत पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या नेतेमंडळींचे आभार मानले. ते पुढे बोलताना म्हणाली की अभिजीत पाटील यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. या मतदारसंघात उस आणि पाण्यावर राजकारण केले जात आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कारण नाही अभिजीत पाटील यांचा कारखाना तुमच्या मदतीला आहे. याचं बरोबर माझाहि कारखान्याच्या माध्यमातून अडचणी दूर केली जातील असा विश्वास देत.
येथील लोकप्रतिनिधी पवार साहेबांना सोडून भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसले घड्याळाकडे गेले. मात्र घड्याळाची वेळ वाईट सुरू असल्याने त्यांनी त्यांचीही साथ सोडली.
उमेदवारी नाकारल्यानंतर ते पवार साहेबांवर बोलत आहेत. आम्ही खपवून घेणार नाही या शब्दात समाचार घेतला.
ते पुढे बोलताना म्हणाले की येथील जनतेकडून दोन्ही उमेदवाराची तुलना केली जात आहे. येथील शेतकऱ्यांच्या आणि अभिजीत पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत. स्वतः पवार साहेबच उमेदवार आहेत असे समजून अभिजीत पाटील यांना निवडून द्या. असे आवाहन यावेळी रोहित पवार यांनी केले.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की पुढील काळात राज्यात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील जनतेने मला साथ द्यावी. असे आवाहन करत त्यांनी येथील लोक पवार साहेबांना सोडून गेले. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर पवार साहेबांवर आरोप करत आहेत. विरोधकांकडे विकासाचे व्हिजन नाही. कोरोना काळात आर्थिक नुकसान करून नागरिकांसाठी काम केले. बंद पडलेला कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले. मात्र समोरच्या उमेदवाराने दूध संघ बंद पाडला. दुधाचा भाव पाडला. त्याच्या जमिनी विकल्या, शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कर्ज काढून शेतकऱ्यांचे नुकसान केले. म्हणून समोरचा उमेदवार गायब आहे. ही लढत आबा विरुद्ध दादा अशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सीना माढा प्रकल्प बंद पडेल असे सांगितले जात आहे. मात्र मी आमदार झाल्यावर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करेन, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन, शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी मोडनिंब मार्केट कमिटीची सुधारणा करेन, मोडनिंब येथे एमआयडीसी उभारण्यात येईल, मोडनिंब येथे सर्व महापुरुषांची स्मारके उभारण्यात येईल असा विश्वास देत मी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. ही निवडणूक आमदार पुत्राविरुद्ध शेतकऱ्यांचा मुलगा अशी आहे. यामुळे जनता दोघांचीही तुलना करून मतदान करेल असा विश्वास व्यक्त केला.