Uncategorized

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,खासदार निलेश लंके यांच्या सभांचा धडाका

 

 

खासदार निलेश लंके 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर प्रतिनिधी
२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर सभा पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये सकाळी ११ वाजता होणार असून यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांच्या वतीने करण्यात आले असून १५ नोव्हेंबर २०२४ रोजी मंगळवेढा येथे खासदार निलेश लंके यांची मंगळवेढा शहरातील मारुती पटांगणामध्ये दुपारी २:०० वाजता जाहीर प्रचार सभा होणार असून त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खासदार निलेश लंके यांची भव्य सभा होणार असून यासाठी मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मतदार भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांनी केले आहे

मतदारांनी कोणतीही संभ्रमात बाळगण्याचे कारण नाही कारण पंढरपूर मंगळवेढ्याची जागा आमची आहे.
यासाठीच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार निलेश लंके यांच्या सभा होणार आहेत. पवार साहेब या मतदारसंघात सभा घेणार नाहीत, ही अफवा आहे. मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये., नियोजन सुरू असून राष्ट्रवादी पंढरपूर मंगळवेढाची जागा पूर्ण तकतीनिशी लढते आहे.खरंतर भगीरथ भालके हे उमेदवार काँग्रेसचेच आहेत का, हे काँग्रेसने तपासणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी मधून बीआरएस पक्षात गेले, आणि बीआरएस मधून आता काँग्रेसमध्ये आले आहेत. सगळ्या पक्षातून फिरून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये लोकचं योग्य उत्तर देतील.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार याची खात्री आहे. शेतकरी हवालदिल झालाय, तरुण बेरोजगार आहे, अनेक प्रकल्प गुजरातला जातायत. पण बाहेरचा एकही प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आला नसल्याचं उमेदवार अनिल सावंत म्हणाले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी उमेदवार निवडणूक लढत आहे . त्यामुळे लोकांमध्ये कोणतीही संभ्रमता राहू, नये असे आवाहन उमेदवार अनिल सावंत यांनी केले आहे,

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close