नेते पदाधिकारी फोडले तरी जनता आमचे सोबत –किरणराज घाडगे
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी भाजपला उघड उघड मदत करण्यासाठीच

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात विधानसभेसाठी शरदचंद्र पवार यांनी उमेदवारी देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे भागीरथदादा भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु ए बी फ़ार्म दिला नाही. दरम्यान अनेक इच्छुक निर्माण केले अन्य उमेदवारबाबत वातावरण निर्माण केले.अनेक अटी सुरु केल्या. त्यामुळे भागीरथदादा भालके यांनी राष्ट्रीय काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर दाखल करुन ए बी फ़ार्म जोडला. त्यानंतर ए बी फॉर्म बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचा ए बी फॉर्म जोडावा निरोप शरद पवार गटाकडून आला परंतु काँग्रेसचा ए बी फॉर्म नाकारणे गद्दारी झाली असती म्हणुन भागीरथदादा भालके यांना काँग्रेसीची उमेदवारी ठेवावी लागली. असे स्पष्ट मत महाआघाडीचे घटक संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे यांनी व्यक्त केले.
असे असतानाही शेवटच्या दिवशी अनिल सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करुन पक्षाचा ए बी फॉर्म देऊन व अखेरच्या दिवशी फॉर्म माघारी घेतला नाही. त्यामुळे भाजपला उघड उघड मदत केली असल्याचा किरणराज घाडगे यांनी आरोप केला.
आता काँग्रेसचे व भागीरथदादा सोबत असणारे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी यांना वेग वेगळी आमिष दाखवून दबाव आणून, लक्ष्मी दर्शन देऊन फोडण्याचा प्रयत्न सुरु असून 2009सारखी परस्थिती निर्माण केली आहे. असे असले तरी जनता ही भगीरथ दादा भालके व महा आघाडी सोबतच असल्याने ही लढाई धन शक्ती विरुध्द जनशक्ती अशी असून जनता आम्हालाच विजयी करेल असा विश्वास किरणराज घाडगे यांनी व्यक्त केला.