Uncategorized

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड

छायाचित्र- स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्धल स्वेरीच्या वतीने कॅनडा मधील योग प्रशिक्षिका जॅकलीन कँप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डावीकडून स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, प्रगती पवार, श्रेणी हिरापचे, ऋतुजा कवडे, डॉ. राजशेखर येळीकर, जॅकलीन कँप व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या विद्यापीठ स्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून बक्षिसे पटकाविली. आता या विजेत्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
छत्रपती शिवाजी महाविद्यालय, बार्शी या ठिकाणी झालेल्या आंतर महाविद्यालय स्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणार्‍या श्रेयश अविनाश मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे आता त्यांची निवड साधारण पुढील महिन्यामध्ये गडचिरोली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या समर्थ सिद्धेश्वर कुलकर्णी यांनी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. ते नागपूर येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्राची अशोक सुर्वे व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अंजली धीरू पवार यांनी हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उत्तम खेळी करून विद्यापीठाच्या संघामध्ये सहभागी होऊन गुजरात येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. अथेलेटिक्स या खेळामध्ये एमबीएच्या प्रथम वर्षातील श्रेणी मनोहर हिरापचे व मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रगती अर्जुन पवार यांना सिल्वर मेडल व तर ऋतुजा वीरभद्र कवडे यांना कांस्यपदक मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, क्रीडा समन्वयक प्रा. संजय मोरे व क्रीडा प्रशिक्षक प्रा. दीपक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने चौथ्या योग दिना निमित्त आलेल्या कॅनडा मधील योग प्रशिक्षिका जॅकलीन कँप यांच्या हस्ते या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्वेरीच्या यशस्वी खेळाडूंचे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close