Uncategorized

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विशेष मतदान केंद्र महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचे नियोजन –सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर दि.03- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक- 07 मे 2024 रोजी होणार आहे. 42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रात प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदारसंघात विशेष मतदान केंद्र राहणार असून यात आदर्श मतदान केंद्राअंतर्गत महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचा समावेश असल्याचे प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आदर्श मतदान केंद्रातंर्गत महिला व्यवस्थापित दोन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापित एक मतदान केंद्र आणि युवा कर्मचारी व्यवस्थापित दोन मतदान केंद्र ही मतदान केंद्र विशेष राहणार आहेत. मतदान केंद्रात रॅम्प, व्हीलचेअर, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, स्वतंत्र प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, उष्मघातापासून वाचण्यासाठी सूचना फलक, आरोग्य सुविधा,पुरेशी प्रकाश व्यवथा, पिण्याच्या पाण्याची सुविधा व इतर बाबी राहणार आहेत.
महिला कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र :- मतदान केंद्र क्र.-102- पंढरपूर- द.ह.कवठेकर प्रशाला, पश्चिम बाजूची खोली क्र.1 व मतदान केंद्र क्र.-183-मंगळवेढा-न्यु इग्लिश स्कूल ,मंगळवेढा पश्चिम बाजूची खोली नं.14 (नवीन इमारत ) येथे महिला कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथील मतदान केंद्रांत संपूर्ण व्यवस्थापन महिलांचे राहणार आहे.
दिव्यांग कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र :- मतदान केंद्र 257-गोणेवाडी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गोणेवाडी, जवाहर योजना इमारत खोंली नं.1 येथे दिव्यांग कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथील मतदान केंद्रांत संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचा-यांचे राहणार आहे.
युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र :- मतदान केंद्र क्र.160- तरटगांव कासेगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पूर्व बाजूची खोली क्र. 2, तरटगांव (कासेगांव) व मतदान केंद्र क्र. 272-लमाणतांडा -माध्यमिक आश्रम शाळा लमाणतांडा जिण्याच्या डाव्याबाजुने खोली नंबर 1 येथे युवा कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथे युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र राहणार आहे.
उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा / प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच शुध्द पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधेची उपलब्धता करण्यात आली असल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
00000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close