Uncategorized

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात कायमच पक्षांपेक्षा परिवार वरचढ

आता पर्यंत झालेल्या निवडणुकीत पक्षांपेक्षा परिवाराचाच झाला आमदार

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-2009 पासून पंढरपूर मंगळवेढा या सर्व साधारण मतदार संघाची निर्मिती झाली.या मतदार संघात पांडुरंग, विठ्ठल, दामाजी हॆ प्रबळ परिवार असून हॆ ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा आमदार होतो. हॆ चित्र सातत्याने दिसते. 2009साली माजी मंत्री विजयसिहं मोहिते पाटील यांनी पांडुरंग परिवाराचे समर्थनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने निवडणूक लढविली होती.त्यांचे विरोधात विठ्ठल परिवाराचे नेते दिवंगत भारतनाना भालके यांनी रिडालोसचे वतीने निवडणूक लढवली. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर विठ्ठल परिवाराचे भारतनाना भालके विजयी झाले.
नंतर 2014साली झालेल्या निवडणुकीत सर्व पक्षांनी युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवीली होती.भारतनाना भालके हॆ काँग्रेस( आय ) कडून तर पांडुरंग परिवाराचे प्रशांतराव परिचारक हॆ भाजप चे युतीचे स्वभामानी swp चे उमेदवार होते.
यावेळी भारतनाना भालके यांना 91863मते मिळाली. तर प्रशांतराव परिचारक यांना 82950मते मिळाली.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसने चंद्रकांत बागल यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 3015 मते मिळाळी. तर शिवसेने कडून दामाजी परिवाराचे नेते समाधान अवताडे उभे होते. त्यांना 40910 मते मिळाली यावेळी ही भारत नाना भालके 8913मतांनी विजयी झाले होते. 2019 साली झालेल्या निवडणुकीत पुन्हा भारतनाना भालके निवडणुकीत मैदानात आले. यावेळी पांडुरंग परिवाराचे नेते स्व. सुधाकरपंत परिचारक भाजप कडून त्यांचे विरोधात लढले यावेळी भारतनाना भालके यांना 89787 मिळाली तर सुधाकरपंत परिचारक यांना 76426मते मिळाली होती.शिवसेनेकडून उभारलेले दामाजी परिवाराचे नेते समाधान अवताडे यांना 54124 काँग्रेस कडून उभारलेले शिवाजीराव काळुंगे यांना 7232मते मिळाली.
या निवडणुकीत भारतानाना भालके 13,361मताधिक्यानी विजयी झाले.
नोव्हेंबर 21मध्ये भारतनाना भालके यांचे निधन झाले. त्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली. यावेळी पांडुरंग परिवार व दामाजी परिवार एक झाले. दोन्ही परिवाराचे वतीने समाधानदादा अवताडे यांनी भाजप कडून निवडणूक लढाविली. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून भागीरथदादा भालके यांनी निवडणूक लढविली.

यावेळी समाधानदादा अवताडे यांना 1,09,459 मते मिळाली तर भागीरथदादा भालके यांना 1,05,517 मते मिळाली. 3942मतांनी समाधानदादा अवताडे विजयी झाले होते.

2024 च्या आताच्या निवडणुकीत  दुभंगलेला विठ्ठल परिवार, दामाजी परिवार व  महाआघाडीचा घटक पक्ष शिवसेना उ बा ठा याची भूमिका निर्णायक ठरणार?नेमके काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले लागले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close