Uncategorized

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 41 नामनिर्देशन पत्राची विक्री

विधानसभा निवडणुकीसाठी अधिसुचना जारी: 29 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारले जाणार अर्ज

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 41 नामनिर्देशन पत्राची विक्री

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर (दि-17):- 252- पंढरपूर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवार दि. 22 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तर नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती देखील सुरु करण्यात आलेली आहे. 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक दि.22 ऑक्टोबर 2024 रोजी 29 जणांनी 41 नामनिर्देशनपत्र पत्र खरेदी केले असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना मंगळवार (दि.22) जारी करण्यात आली आहे. या दिवसापासूनच मतदारसंघांत उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येत असून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारसह पाच जणांना प्रवेश मिळणार आहे. शंभर मीटर आवारात फक्त तीन वाहनांना प्रवेश मिळणार आहे. दि. 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून दि 30 ऑक्टोंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. दि 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवारांच्या फक्त तीन वाहनांना प्रवेश मिळणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील उमेदवारासह फक्त पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे. या परिसरात मिरवणूक, सभा घेण्यास तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा, वाद्य वाजविण्यास प्रतिबंध असणार आहे.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी suvidha.gov. In पोर्टल उपलब्ध केले आहे.मात्र अर्ज डाऊनलोड करुन प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना एकच सूचक असणार आहेत. अपक्ष व इतर पक्षांच्या उमेदवारांना 10 सूचक लागणार आहेत. ते सूचक मतदारसंघातील मतदार असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
000000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close