साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी डी पी आय चे वतीने एल्गार महासभेचे आयोजन


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी डी पी आय चे वतीने एल्गार परिषदेचे आयोजन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर -वीर जिजामाता भोसले उद्यान, भायखळा (पूर्व ) मुंबई येथे शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दुपारी 1(एक )वाजता केले आहे.या भारतरत्न एल्गार महासभेस मोट्या संख्येने यावं लागतंय असं आवाहन सोलापूर जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे यांनी केले आहे.

पुढे बोलतांना वायदंडे म्हणाले कीं,संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या अग्रणी शिलेदारात अण्णाभाऊ साठे यांचे स्थान होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा १३ लोकनाट्य,३ नाटके,,१३ कथासंग्रह,३५ कादंबऱ्या,१ शाहीरी पुस्तक,१५ पोवाडे,१ प्रवास वर्णन,७चित्रपट कथा एवढी असून “फकिरा” कादंबरीस राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या साहित्याचे 28 भाषेत भाषांतर झाले आहे.
भारतरत्न पुरस्कारासाठी साहित्य क्षेत्रातील व्यक्तीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी लागणारे सर्व निकष अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याला लागू होतात त्यामुळे त्यांना निकषानुसार “भारतरत्न पुरस्कार “देण्यात येऊन त्यांचा गौरव करावा ही डी पी आय ची मागणी आहे. या साठी मुंबई येथे एल्गार महासभेचे आयोजन केले आहे.

,
या महासभेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डेमोक्रटीक पार्टी ऑफ इंडियचे राष्टीय अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे हॆ असणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री सतेज पाटिल हॆ उपस्थित राहणार आहेत.स्वागताध्यक्ष अजिंक्य चांदणे प्रदेशाध्यक्ष डेमोक्रटीक पार्टी ऑफ इंडिया समन्वयक अशोक आल्हाट, युवा प्रदेशाध्यक्ष सोहन लोंढे व राज्यकार्यकारिणी एल्गार महासभा यशस्वी करणेसाठी प्रयत्न करीत आहेत.


