Uncategorized
कॅनरा बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर, प्रतिनिधी:-कॅनरा बँक पंढरपूर शाखेतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुंगत (ता.पंढरपूर) येथील श्री तुंगेश्वर हायस्कुलमधील इ. 5 वी ते इ. 10 वीमधील होतकरू विद्यार्थ्यांना 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शाखाधिकारी चुर्तवेदी यांनी शिष्यवृत्ती मिळालेल्या होतकरू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी बँकेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फनी तेजा, हिम्मत कापसे, आशिष तिवाटणे, सेवक भोसले यांनी परिश्रम घेतले.