Uncategorized
पंढरपूर येथे “माणुसकी “वृद्धाश्रम सुरु

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर –
संघर्ष नेहरू युवा मंडळ, वाखरी ही पंढरपूर स्थित स्वयंसेवी संस्था असून सदर संस्था युवक कल्याण, महिला बालविकास, पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांमध्ये गेल्या 14 वर्षापासून कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून 21 ऑगस्ट या जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून श्री संत नारायण देव बाबा भक्त निवास, चंद्रभागा बस स्थानकाशेजारी, बायपास रोड, पंढरपूर येथे “माणुसकी वृद्धाश्रम सुरु करण्यात आले आहे. सदर वृद्धाश्रमामध्ये सर्व जाती धर्माच्या निराधार तसेच गरजू जेष्ठ नागरिकांना निशुल्क प्रवेश देण्यात आहे.
जेष्ठांच्या आयुष्याची संध्याकाळ ही आनंददायी व्हावी या उद्देशाने वृद्धाश्रमाची सुरवात करण्यात आली आहे.. सदर वृद्धाश्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे सूरज पोळ, संचालक, सेंटर फॉर ई-गव्हर्नन्स ट्रेनिंग न्ड रिसर्च, पुणे तसेच संस्थेचे अध्यक्ष नागनाथ पांढरे, सचिव सौदागर जगदाळे, खजिनदार शाकिर मुजावर, शिवेश्वर परिवार सदस्य फंचीबापू शिंदे. तसेच संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. गरजू व निराधार वृद्धांनी प्रवेशाकरीता 9881361195, 7927768987, या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच समाजातील सजग नागरिकांनी गरजू वृद्धांपर्यंत सदर माहिती पोहचविण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
