साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान टाकळी चे वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव २०२४ प्रबोधनाने साजरा होणार
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
टाकळी (पंढरपूर ):- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान टाकळी चे वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव २०२४ प्रबोधनाने साजरा होणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे नानासाहेब लोखंडे यांनी दिली.गुरुवार दिनांक ०१/०८/२०२४सकाळी ९ वाजता प्रतिमेचे पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार असून सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होणार असून याचे उदघाटक – रामदास भगवान ढोणे (जि.प.सदस्य) यांचे हस्ते होणार आहे.सकाळी ११ वाजता भव्य वृक्षरोपण संजय देविदास साठे (सरपंच, लक्ष्मी टाकळी) यांचे हस्ते होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता प्रबोधनत्मक व्याख्यानाचे आयोजन केले असून व्याख्याते – सुनिल वाघमारे (अध्यक्ष – फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच, पंढरपूर) हें असणार असून व्याख्यानाचा विषय – ” जग बदल घालूनी घाव सांगुनी गेले मज भिमराव ” हा आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष – . राजेंद्र पाराध्ये माजी प्राचार्य (विवेक वर्धीनी कनिष्ठ महाविद्यालय) हें आहेत.
शुक्रवार दिनांक ०२/०८/२०२४सकाळी ९ वाजता रांगोळी स्पर्धा
सायकांळी ५ वाजता निबंध स्पर्धा, सायकांळी ६ वाजता भव्य संगीत खुर्ची स्पर्धा,सायंकाळी ७.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे.व्याख्याते – .प्रा. सुकुमार कांबळे संस्थापक अध्यक्ष डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया हें असणार असून व्याख्यानाचा विषय – ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व मातंग समाज ” हा आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी – श्रीकांत कसबे (संपादक जोशाबा टाईम्स )हें आहेत.
शनिवार दिनांक ०३/०८/२०२४ दुपारी २ ते रात्री ७ वाजे पर्यंत प्रिती भोजन असून रात्री ८ वा. “गाणी अण्णाभाऊंची कार्यक्रम” सादरकर्ते – राधाकृष्ण कलामंच, ल.टाकळी. हा कार्यक्रम होणार आहेरविवार दिनांक ०४/०८/२०२४
•सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नगर, लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर. येथून निघणार असून मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे.