अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचा 60 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-संतपेठ गुजराती कॉलनी पंढरपूर येथे अखिल भारतीय सफाई मजदूर कॉ संघटनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चरणसिंगजी टाक साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष दिलीप चांगरे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे देशभरात 60 वा वर्धपानदिन साजरा झाला.आज पंढरपूर शाखेच्या वतीने प्रथमता संघटनेचे संस्थापक लाड पागे समितीचे जनक स्वर्गीय वासुदेवजी दादासाहेब चांगरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मचाऱ्यांन करीता व्यसनमुक्ती व आरोग्य विषयी माहिती देण्याचे शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये बंधू भगिनी यांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.
अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना ही देशातील पहिली ट्रेड युनियन संघटना आहे देशामध्ये 27 राज्यांमध्ये या संघटनेची शाखा आहेत या संघटनेचे संस्थापक लाड पागे समितीचे जनक स्वर्गीय वासुदेवजी दादासाहेब चांगरे यांनी पदवीचे शिक्षण 1960साली मिळवल्या वर अस्पृश्यतील सफाई कामगारांच्या उद्धारासाठी अहोरात्र काम केले भारताचे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे दि. 29/7/ 1964 साली अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेचे प्रथम अध्यक्ष प्रोफेसर यशवंतराव रॉय हे होते.प्रोफेसर यशवंतराव रॉय यांनी परमपूज्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत संविधान निर्मितीसाठी काम केले होते. 1978 ला संघटनेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सरदार बुटासिंग त्यांनी भारताचे गृहमंत्री पद व राज्यपाल पद भूषवले होते संघटनेचे तिसरे अध्यक्ष संघटनेचे संस्थापक स्वर्गीय वासुदेवरावजी चांगरे तर संघटनेचे चौथे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंगजी टाक साहेब या संघटनेच्या राष्ट्रीयध्यक्ष पदावरूनच या संघटनेच्या वतीनेच सफाई कामगारांचे उद्धार झाल्याचे दिसून येते सन 1992 ला संघटनेच्या वतीने परंपरेने स्वच्छतेच्या कामात गुंतलेल्या सफाई कामगारांसाठी वित्तीय महामंडळ कामगाराच्या सामाजिक आर्थिक अभ्यासासाठी राष्ट्रीय सफाई कामगार आयोग स्थापना करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली. व मा.चांगरे साहेब , दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मांगीलाल आर्या श्री. रामप्रसाद वाल्मिकी यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीच्या बोट क्लब येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले हे आंदोलन 44 दिवस चालू होते आंदोलनाच्या ताणतणावा मुळे श्री रामप्रसाद वाल्मिकी यांना हृदयविकाराचा झटका आंदोलन स्थळी आला व ते शहीद झाले. नंतर आंदोलनाची दखल घेऊन पंतप्रधान नरसिंहराव यांनी केंद्रीय सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्या बाबत मान्यता घोषणा केली .केंद्राच्या धर्तीवरच 1994 ला महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाची पण स्थापना केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वासुदेव चांगरे साहेबांना आयोगाच्या चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली .त्यानंतर राज्यभर दौरे केले व लाड पागे कमिटी च्या शिफारसी बाबत जनजागृती केली महाराष्ट्र शासनाची लाड पागे कमिटी 1975 ला स्थापन झाली होती पण ज्यावेळेस महाराष्ट्र आयोगाचे चेअरमन म्हणून चांगरे साहेब झाले. त्यावेळेसच खऱ्या अर्थाने लाड पागे कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येते सन 1997/98 ला आयोगाचा दौरा पंढरपूर मध्ये झाला त्यावेळेस आयोगाचे चेअरमन वासुदेव चांगरे साहेब व महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य संघटनेचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय टाक साहेब हे संतपेठ गुजराती कॉलनी येथे आले होते त्यावेळेस मुख्याधिकारी जीवनजी सोनवणे होते .महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाची पंढरपूर नगरपालिकेत बैठक झाली. न .पा.पंढरपूरने लाड पागे कमिटीच्या शिफारशी मान्य केल्या व पंढरपूरात प्रथमताच जवळजवळ 50 पेक्षा जास्त लोकांना वारसा हक्काने नियुक्ती आदेश देण्यात आले होते. तर महाराष्ट्रात लाखो लोकांना वारसा हक्काने नोकरी मिळाली म्हणून मा.वासूदेवजी चांगरे दादासाहेबांना लाड पागे वारसा हक्काचे जनक म्हणून उपाधी मिळाली. लाड पागे चा अभ्यास असल्याकारणानेच औरंगाबाद खंडपीठाने लाड पागे वारसा हक्का वरील स्थगिती दिलेल्या याचिकेवर अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना आदरणीय टाक साहेब यांच्या नेतृत्वखाली सक्षमपणे उभी राहिली व लढाई जिंकली हि. दादासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाल्याचे दिसून येतो.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुकाध्यक्ष गुरू दोडिया, उपाध्यक्ष काशिनाथ सोलंकी ,सचिव महेश गोयल, अमित वाघेला ,सचिन मेहडा, छगन पुरबिया,हरिष दोडिया,राजू वाघेला,रमेश सोलंकी,प्रमोद मेहडा,सुनिल मेहडा,चंदू मेहडा,प्रविण सोलंकी,अनिल वाघेला यांनी परिश्रम घेतले.