Uncategorized

स्वेरी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये ऑनलाईन वेबिनार संपन्न

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 

श्रीकांत कसबे

पंढरपूर- सध्याच्या लॉकडाउनच्या काळामध्ये स्वेरीकडून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘न्यू ट्रेंड्स इन सोलार टेक्नॉलॉजी अँड हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ या विषयावर वेबिनार आयोजीत करण्यात आला होता.
सुरुवातीला प्रा. महेश यड्रामी यांनी ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत करून वेबिनारच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी यांनी कॉलेज मध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम व त्यातून विद्यार्थ्यांचा होत असलेला सर्वांगीण विकास याबद्दल माहिती दिली. या वेबिनार मध्ये प्रथम प्रा. अनिल टेकळे यांनी सौरऊर्जेचे भविष्यातील महत्त्व व सध्याचे सौरऊर्जा संदर्भातील नवनवीन तंत्रज्ञान यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. विरेश चाकली यांनी ‘हायब्रीड इलेक्ट्रिकल व्हेइकल्स’ ची भविष्यातील गरज व त्यातील नवीन तंत्रज्ञान याबद्दल महत्वाची माहिती सांगितली. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. या वेबिनारसाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. धनराज डफळे यांनी काम पाहिले. या वेबीनार मध्ये विविध कॉलेज मधून जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. वेबिनारच्या शेवटी प्रा. अस्मिता सनगर यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close