आषाढी वारीसाठी उमेदच्या वतीने विविध स्टॉल उभारणी– मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे

आषाढी वारीसाठी उमेदच्या वतीने विविध स्टॉल उभारणी– मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर -आषाढी वारी सन 2024-25 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद सोलापूर, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पंढरपूर अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने पंढरपूर तालुक्यांमध्ये पिराची कुरोली, वाखरी,भंडीशेगाव,गोपाळपूर, भटुंबरे,भोसे, करकंब, आढीव, रोपळे ह्या गावांमधून एकूण विविध प्रकारचे 75 स्टॉल लावण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी उमेदच्या वतीने आषाढी वारीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ,हस्तकला वस्तू, धूप अगरबत्ती, देवपूजेचे साहित्य, स्टेशनरी, साड्या असे विविध प्रकारचे स्टॉल उभारणी करण्यात आलेली आहे.
राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष कडून आषाढी वारीकरिता आलेल्या महिला यांच्याकरिता 1000 सॅनिटरी पॅड मोफत वाटपासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित झालेल्या पदार्थाना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व प्रकल्प संचालक. डॉ.सुधीर ठोंबरे यांच्या संकल्पनेतून सदर स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.
आषाढी वारीच्या कालावधीमध्ये लावण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून महिला बचत गटांची उलाढाल जास्तीत जास्त होवुन महिलांना आर्थिक फायदा व्हावा अशी अपेक्षा प्रकल्प संचालक. डॉ.सुधीर ठोंबरे यांनी स्टॉलला सदिच्छा भेट दिल्यानंतर व्यक्त केली.
वरील सर्व गावातील स्टॉल उभारण्यासाठीचे नियोजन उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापक कृणाल पाटील, तालुका व्यवस्थापक गजानन सुतार, सिध्देश्वर रुपनर, सर्व प्रभाग समन्वयक, प्रभाग संघ व्यवस्थापक, सर्व प्रेरिका करत आहेत.
उमेदच्या वतीने आषाढी वारीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून महिला यांनी उत्पादित केलेल्या पदार्थाना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिला यांना आर्थिक फायदा व्हावा असा उद्देश आहे..
– मनिषा आव्हाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी