मराठा आरक्षण व इतर मागण्या दोन दिवसात मार्गी न लावल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीस येण्यास सकल मराठा विरोध करणार

Joshaba times web news portal
–Shrikant kasabe
सकल मराठा समाज पंढरपूर शहर व तालुका बावीस नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर जिल्ह्याचे एसपी शिरीष सरदेशपांडे स सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव या मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे माढा व सर्व मराठा समाज बांधवांच्या समक्ष पंढरपूरमध्ये चर्चा होऊन 1)मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगे सोयरे कायदा अंमल बजावणी. २) पंढरपूर येथे अरीहंत पब्लिक स्कुल जवळ मराठा भवन बांधणे व मुलां- मुर्तीसाठी वस्तीगृह बांधणे. ३) पंढरपूर येथे सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरु करणे. ४) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक २०१७ परिक्षेच्या प्रवर्गातील ११८ पैकी ६१ महिला उमेदवारांची नियुक्ती होणे बाबत. ५) पंढरपूर शहरातील नगरपालिका हद्दीतील कुणबी नोंदी शोधणे, वरील सहा मागण्या दोन महिन्यात म्हणजे 2023 डिसेंबर किंवा 2024 च्या जानेवारीपर्यंत पूर्ण करतो असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. यापैकी मराठा समाज भवनाची पूर्ण झालेली दिसत असताना उर्वरित पाच मागण्या मान्य केल्या तशाच आहेत तरी दोन दिवसात पूर्ण कराव्यात यासाठी मराठा समाज पंढरपूर शहराने तालुका सकल मराठा समाज आक्रमक आहे जर प्रशासन व मुख्यमंत्री यांनी वरील मागण्या तात्काळ पूर्ण केल्या शिवाय आषाढी यात्रेला येवू नये जेणे करून यात्रेमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा आमची फसवणूक केली आहे. व ते मराठा, ओ.बी.सी. वाद निर्माण करण्याचे षडयंत्र करत आहेत, आपण या राज्याचे मुख्यमंत्री असल्याने आपण आम्हाला न्याय द्याल याची खात्री आहे, तेव्हा आपण वरील मागण्या तात्काळ मान्य करुन घोषणा करावी मगच पंढरपूरला यावे अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन व प्रशासन जबाबदार असेल.अशा ईशाऱ्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. या निवेदनावरमाजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,माजी नगरसेवक किरणराज घाडगे, रामभाऊ गायकवाड,स्वागत कदम, बाळासाहेब बागल,डी. एम. मोरे, अमर सूर्यवंशी,संदीप शिंदे, प्रशांत शिंदे,श्रीकांत शिंदे, राधेश बाधले पाटील आदींच्या सह्या आहेत.