कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
वाळु तस्करीस त्वरीत आळा न बसविला तर आंदोलन करण्याचा दिला इशारा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर:-कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी यांचा पुणे येथे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश 28 डिसेंबर रोजी झाल्याची माहिती अरूणभाऊ कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजु शिंदे व तालुकाध्यक्ष अंकुश शेंबडे हे उपस्थीत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे वतिने त्याचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना अरूणभाऊ कोळी म्हणाले की, माझी सामाजिक कामाची पद्धत आपणा सर्वांना माहित आहे.आपणा सर्वांचे मार्गदर्शन व्हावे हि माफक अपेक्षा आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात वाळू चोराने धुमाकूळ घातला असून त्याविरोधात मी सातत्याने आवाज उठविला.आहे.तहसिलदार यांनी गोपाळपूर येथे बेसुमार वाळु उपसा करणार्या पाच होड्या फोडल्या व अजून ही कारवाई सुरू आहे पण आरोपी सापडत नाहीत. यापैकी अनेक आरोपी हे तडीपार आहेत. होड्या ह्या कोळी समाजाचे दैवत आहे त्यामुळे त्या जप्त करून लिलाव करावा.त्यामुळे शासनास आर्थिक उत्पन्न मिळेल व आमच्या भावनाही दाखवणार नाहीत
ज्यांचे शेतातून वाळु उपसा व वाहतूक होते त्यांचे उताऱ्यावर बोजा चढवावा अशी मागणी करुन ज्या ग्रामपंचायत हद्दीतून वाळु उपसा होईल त्या ग्रामपंचायतीस जबाबदार धरुन त्यांचे अनुदान व मानधन रोखले पाहीजे तरच चोरीस आळा बसेल.
ज्या शेतातून वाळु तस्करांनी वहातूकीसाठी रॅप केले आहेत ते जेसीबी च्या सहाय्याने उध्वस्त करावे..यासह अनेक मागण्या केल्या असून या मागण्याचे निवेदन आम्ही प्रशासनास देणार असुन यामागण्याचा विचार करून कारवाई न झाल्यास कोळी महासंघ, वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटना एकत्र येऊन आंदोलन करतील असा इशारा अरूणभाऊ कोळी यांनी दिला.