छत्रपतींच्यासह महापुरूषांचे अपमान ही तर घटना बदलाची तालीमच –राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नाम फलकाचे उद्घाटन प्रसंगी मिनचे (ता. हातकणंगले) येथे बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे, प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे
मिणचे(ता हातकणंगले):- छत्रपती शिवाजी महाराजांच्यासह फुले, शाहू ,आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या थोर महापुरुषावर जाणून बुजून टीका करण्याच षडयंत्र असून भविष्यात देशाची घटना धोक्यात येणार असल्याचे संकेत देऊन महापुरुषांच्या अपमानानंतर घटना बदलल्यानंतर जनतेत किती असंतोष निर्माण होतोय याची चाचपणी जातीयवादी सरकार घेत असल्याची घणाघाती टीका करून आंबेडकरी विचारांची चळवळ जातीवाद्यांच्या दावणीला गेल्यामुळेच हे सरकार असे धाडस करत असल्याची भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी मांडली ते मिणचे (तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर) येथे संघटनेच्या नाम फलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना प्रा. सुभाष वायदंडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाना राजकारणातील पदे महत्वाची वाटतात तर पुरोगामी विचारांची चळवळ चालवून सत्तेत जाणाऱ्यांना आंबेडकरी विचारांचा विसर पडून सत्ता महत्त्वाची वाटते हिम्मत असेल तर रामदास आठवले यांनी राजीनामा द्यावा आणि उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवावा.
स्वागत व प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश घाटगे यांनी केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे यांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रमास युवकचे राज्य उपाध्यक्ष अंकुश (भाऊ) भोंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष (ग्रामीण) भीमराव (अण्णा) गडहिरे, राज्य सल्लागार कमिटी सदस्य अंकुश भाऊ शिंदे मेजर,राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे, वाहतूक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्निल बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ संगीता भोंडे, सांगली शहर जिल्हाध्यक्षा सौ. शिला बनसोडे, सातारा जिल्हा अध्यक्ष इंद्रजीत चव्हाण,कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा सौ. पूजा बागडे, सांगली जिल्हा अध्यक्षा वनिता सोनवले, सातारा जिल्हा अध्यक्षा सोनाली लोकरे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश वाघमारे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख जनार्दन घाटगे, दौलत घाटगे, शिवाजी घाटगे (महाराज),स्वप्निल भिसे, वर्षा वाघमारे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार सुरवसे, गोविंद सकट, नयना लोंढे सौ खटावकर,पांडुरंग ऐवळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार हातकणंगले तालुका अध्यक्ष रवी हंकारे यांनी मानले.