शालेय अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही –ना. रामदास आठवले

शालेय अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार नाही –ना. रामदास आठवले
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राज्य शासनाने शालेय अभ्यास क्रमात मनू स्मृती मधील काही श्लोकचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु असून मनुस्मृती हीं विषमतावादी असून मानुसपण नाकारणारी असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध करुन तिचे दहन केले आहें. ती पुन्हा नव्याने अभ्यास क्रमात आणू नये असे आपण शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांना सांगितले असून त्यांनी शालेय अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार नसल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या संत चोखामेळा पुण्यतिथी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आले होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, बुद्ध येशू, महावीर पासून रामायण, महाभारत, मोघल, शिवाजी महाराज, इंग्रज यांचा इतिहास अभ्यास क्रमात असणार आहे.
आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असुन त्यांचे जन्म स्थळ चोंडी येथील कार्यक्रमास उपस्थित होतो या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौडी येथे अंतराराष्ट्रीय स्मारक निर्माण करणार असल्याची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार असून मला कॅबिनेट मंत्री पद मिळेल व विधानसभेला रिपब्लिकन पार्टीला योग्य संधी मिळेल असे स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना मोदी सत्तेत आलेवर महागाई, बेरोजगारी व जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आमचा पक्ष मोदी सरकार कडे पाठ पुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव सुनील सर्वगोड, प. महाराष्ट्र सचिव जितेंद्र बनसोडे, तालुकाध्यक्ष संतोष पवार शहराध्यक्ष ऍड. किर्तीपाल सर्वगोड,डी. एस. एस प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे आदी उपस्थित होते.