सदाचार हाच बुद्धाचा जीवन मार्ग…’ -प्रा.भास्कर बंगाळे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
‘पंढरपूर :-“बुद्ध धम्म जगाला शांतीचा मार्ग दाखवतो..बुद्ध हा मार्गदाता आहे.. पंचशील व अष्टांग मार्ग अंगीकारल्यामुळे दुःख नाहीसे होऊन सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते.. वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावे. बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून आपणास हा बुद्धाचा मार्ग दाखवला आहे.. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आचरण करावे…’ असे मत ग्रामीण साहित्यिक प्रा.भास्कर बंगाळे यांनी व्यक्त केले. अजनसोंड या गावी बुद्ध जयंती व गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बुद्धाच्या जीवनाविषयी त्यांनी बरीच माहिती सांगितली. मूळचे अजनसोंड ता.पंढरपूर या गावचे परंतु सध्या नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त कलाशिक्षक शीलरतन सौदागर बंगाळे व त्यांचे कुटुंबीय यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वखर्चाने अजनसोंड गावी समाज मंदिराचे सुशोभीकरण करून सोलापूरहून बोलावलेले भंतेजी संघानंद यांच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुण्याहून लक्झरी बस करून त्यांचे कुटुंबीय, आय.टी.आय.चे प्राध्यापक रवींद्र वडवेकर, सेवानिवृत्त पोलीस मुंबई सुधाकर जेठीथोर, पुणे म.न.पा. सेवानिवृत्त अधिकारी प्रशांत चौरे, सिव्हिल इंजिनिअर युवराज जेठीथोर, पोलीस मुंबई सुमेध जेठीथोर,शामल जेठीथोर, मीनाक्षी बंगाळे, कविता वडवेकर,नीलम जेठीथोर, वर्षा चौरे,वनिता सोनवणे, शुभम चौरे यांचेसह नातेवाईक, मित्रमंडळी कार्यक्रमास हजर होते. आपण किती कमावतो यापेक्षा आपण समाजाला काय देतो हे अधिक महत्त्वाचे असते. हा एक आदर्श या कुटुंबाने घालून दिलेला आहे.
याप्रसंगी शीलरतन बंगाळे व त्यांच्या सुविध्य मुख्याध्यापिका पत्नी सविता यांनी मनोगत व्यक्त केले. बुद्ध विहारात दररोज बुद्ध वंदना घेऊन लहानपणापासूनच मुलांच्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांच्या विचारांचे संस्कार करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी भास्कर बंगाळे यांनी लिहिलेली पुस्तके त्यांना सप्रेम भेट देण्यात आली. अनेक मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हनुमंत बंगाळे व समता सैनिक दल पंढरपूर यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवानिवृत्त मेजर जयद्रथ बंगाळे, लक्ष्मण अर्जुन बंगाळे गुरुजी, नितीन बंगाळे, अमर भीम तरुण मंडळ व तरुण वर्ग यांनी विशेष कष्ट घेतले.याप्रसंगी सरपंच दीपक घाडगे, उपसरपंच नंदाताई सोनटक्के, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,तुकाराम डुबल,दत्तात्रय घाडगे,मा. मुख्याध्यापक अशोक बंगाळे, योगेश जाधव, अमित कसबे, अर्जुन बंगाळे, कैलास बंगाळे, विजय बंगाळे,नितीन बंगाळे,मऱ्यापा बंगाळे, छबू बंगाळे,नारायण बंगाळे,गणेश कांबळे ,प्रितम वाघमारे,सोमनाथ बंगाळे,हर्षद बंगाळे,बापू सावंत,भूपाल मोरे,हणमंत बंगाळे,मिलींद सावंत,संतोष वायदंडे,सचिन मोरे,सोहेल प्रक्षाळे,स्वप्नील प्रक्षाळे,किसन बंगाळे ,सागर गायकवाड,अतुल गायकवाड, आकाक्ष बंगाळे ,बबलू बंगाळे,आबा बंगाळे,बापू प्रक्षाळे,तुकाराम बंगाळे,अमर बंगाळे ,शुभम बंगाळे,बंटू बंगाळे आदींनी सहकार्य केले.