अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी काकासाहेब बुराडे यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी पंढरपूर येथील जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांची निवड करण्यात आली..
संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत सुतार साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेश कार्याध्यक्ष प्रा नानासाहेब ठेंगले यांनी वरील निवड जाहीर केली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्थारातून स्वागत होत आहे….
महापुरुषांचे विचार व कार्य समाजात पोहचविणे,. संघटनेचे गाव, शहर, तालुका, जिल्हा राज्य पातळीवर पदाधिकारी नियुक्त करणे,राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र भावना, सामाजिक बांधलकीची भावना वाढीस लावणेचे दृष्टीने कार्य करणे,समाजाचे प्रश्न सोडविणे, चर्चा सत्राचे आयोजन करणे,शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे व त्यांना न्याय मिळवून देणे,त्यासाठी मेळावे व संभाचे आयोजन करणे,सभासद नोंदणी अभियान राबविणे व ओळख पत्र देणे,आदी संघटनेची उद्धेशे असून यासाठी मी प्रामाणिक जबाबदारीने कार्य करणार असल्याचे काकासाहेब बुरांडे यांनी या प्रसंगी सांगितले.