उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय मध्ये प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी स्वागत समारंभ संपन्न!


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथे बी.एड. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी स्वागत समारंभप्रसंगी श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मा प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी विद्याध्यर्थ्यांना संवोधित करताना अधुनिक जगात शिक्षणाचे महत्त्व सांगितले व गुणवत्ते अभावी असणारी सुशिक्षीत बेकारी वर मात करण्यासाठी ए.आय. च्या जगात तुम्ही जितके ज्ञान घ्याल तेच तुम्हाला कर्तृत्ववान क्षमताधिष्ठीत शिक्षक बनवेल असा संदेश दिला. तसेच महाविद्यालयाची निवड करुन प्रवेश घेतल्याबद्दल प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवठेकर प्रशाला पंढरपूर चे माजी मुख्याध्यापक श्री एस.पी. कुलकर्णी सर यांनी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्टये व विद्याथ्यांचा शिक्षक होण्यासाठो आवश्यक क्षमता विकसित कराव्यात व भायी काळात शिक्षकाने आपली भूमिका व जबाबदारी या बाबत सजग असावे असे मौलिक विचार व्यक्त केले.
या प्रसंगी उमा शिक्षण संकुलाचे प्रशासन अधिकारी श्री सुर्यकांत पारखे, प्र. प्राचार्य श्री जाकीर बागवान, प्रा.डॉ. विलास बंडगर, प्रा. सविता दूधभाते, प्रा.श्री रोहित खिस्ते व शिक्षकेतर कर्मचारी श्री विजय वाघमारे, श्री दत्तात्रय घाडगे, श्री त्रिगुण लोखंडे, श्री अख्तर पटवेकरी, श्री सागर येडगे व बी.एड. प्रथम व व्दितीय वर्ष प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.




