Uncategorized

मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे – शरद पवार

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाही. मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहे. दरम्यान, मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घेण्याची असल्याचे मत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बुधवारी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे. क्षीरसागर यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे. त्यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी शरद पवार यांनी मतदारांना केले आहे.

*शरद पवार यांनी ऐकवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण*
माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी मोडनिंब येथेदेखील पवार यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पवार यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण ऐकवले आहे. पंतप्रधान महागाईवर बोलायला तयार नाहीत, अशी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधानावर केलेली टीका यावेळी शरद पवार यांनी ऐकवली आहे. नरेंद्र मोदी यांचे 2014 चे भाषण यावेळी त्यांनी ऐकले तर दिलेल्या आश्वासन त्यांनी पाळलेले नाहीत सामान्य माणसाची महागाईतून सुटका केलेली नाही आणि शिव्या आम्हा लोकांना घालत आहेत असे यावेळी पवार यांनी सांगितले. आपल्याकडे एक म्हण आहे, लबाडाच्या घरचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, अशी स्थिती मोदी साहेबांनी आज देशामध्ये केली आहे, अशी टीका यावेळी पवार यांनी केली आहे.

यावेळी यावेळी माढ्याच्या शिवाजी कांबळे, माजी नगराध्यक्षा मिनलताई साठे, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, उत्तमराव जानकर, नलिनी चंदेले धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव, विजयसिंह मोहिते पाटील, बळीराम साठे, उत्तम जानकर, संजय कोकाटे, अभिजित पाटील, धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव, शिवाजी कांबळे, नलिनी चंदेले, दत्ताजी गवळी, दादासाहेब साठे, मिनलताई साठे, आनंद टोणपे, समीर मुलाणी, बाबूतात्या सुर्वे, सयाजी पाटील, आनंद कानडे, यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close