स्मृतिशेष मारुती खिलारे यांचा “स्मृती दिन “पाठखळ येथे धम्म प्रवचनाने साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :- बुद्ध, फुले आंबेडकरी विचाराचे प्रचारक व सेवानिवृत्त उप कार्यकारी अधिकारी (M S E B )स्मृतिशेष मारुती धोंडिबा खिलारे यांचा द्वितीय स्मृतिदिन त्यांचे कुटुंबाचे वतीने पाठखळ ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथे साजरा करण्यात आला. स्मृतिशेष मारुती धोंडिबा खिलारे यांनी “चलो बुद्ध की और ” या अभियान अंतर्गत धम्म दिक्षा घेतली होती.व त्याच मार्गाने वाटचाल सुरु करून हा विचार समाजात रुजविण्याचे कार्य त्यांनी आपली नोकरीं संभाळून हयातभर केले.
यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस वंदन करण्यात आले. त्यानंतर स्मृतिशेष मारुती खिलारे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर बौद्धाचार्य विलास जगधने सर यांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील घेऊन आपल्या अमोल वाणीने मानवी जीवनाच्या कल्यानाचा मार्ग यावर प्रबोधन करून मानवाला बुद्ध आणि धम्म कसा गरजेचा आहे या विषयावर प्रवचन दिले . त्यानंतर सामूहिक पुष्प अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी सा. जोशाबा टाइम्सचे संपादक श्रीकांत कसबे यांनी जोशाबा टाइम्सचे वतीने आदरांजली अर्पण केली.
खिलारे साहेबांच्या पत्नी श्रीमती शांताताई खिलारे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला असून या कार्यक्रमात खंड पडू देणार नाही असा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांच्या मुली सौ. वर्षा साळवे सौ. मालिनी वाळके कु. माधवी मारुती खिलारे यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.