Uncategorized

गौतम वि‌द्यालय येथेल विध्यार्थ्यांना ना.रामदास आठवले यांचे हस्ते स्पोर्ट ड्रेस वाटप 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर, दि.22/08/2025 रोजी  गौतम वि‌द्यालय पंढरपूर येथे ना.रामदास आठवले यांचे हस्ते वि‌द्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप    करण्यात आले.  हा कार्यक्रम विद्यालयाच्या मैदानात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार  वाघमारे सर है होते, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई चे चेअरमन  रामदास आठवले  (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार) हे उपस्थित होते.

तसेच  राजाभाऊ सरवदे  (प्रदेशाध्यक्ष आर.पी.आय (आ) महाराष्ट्र राज्य) हे ही कार्यक्रमासाठी उपस्थित होते.  सुनीलजी सर्वगोड (कार्यकारणी सदस्य पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई व रिपाई राज्य संघटक ),  अरविंद कांबळे  सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. आठवले  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आपल्या सर्वांना मोठी करायची आहे. गौतम विद्यालय व संत गाडगे महाराज चोखामेळा वि‌द्यार्थी वसतीगृह यांना ऐतिहासिक व सामाजिक, शैक्षणिक वारसा असून हा वारसा आपल्याला जतन करायचा आहे. यासाठी येथे नवीन इमारत बांधकाम करण्याचा मानस असून, तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. तसेच, विद्यार्थ्यांनी शिकून मोठे होण्याचे व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले. यावेळी आर.पी.आय कार्यकर्ते, समाजसेवक व माजी वि‌द्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वि‌द्यार्थी, विद्यार्थीनी या सर्वाच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

सूत्रसंचालन  रुपनर सर यांनी केले व प्रास्ताविक नितीन कांबळे सर यांनी सांगितले. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार    कवडे सर यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close