कर्मवीर’ मध्ये रेशीम शेती व व्यवसायातील संधी या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे १४ फेब्रुवारीस आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पुरस्कृत ‘रेशीम शेती व व्यवसायातील संधी’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन सोमवार दि. १४/२/२०२२ रोजी महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे. सदर कार्याशाळेमध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील रेशीमशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ डॉ. ए.डी. जाधव हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळेमध्ये रेशीम किड्यांचे संगोपन, तुतीची लागवड, उच्च प्रतीची कोशनिर्मिती-विक्री, शासकीय अनुदानाच्या योजना व या व्यवसायातील संधी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील यशस्वीपणे रेशीम शेती करणारे शेतकरी आपले अनुभव सांगणार आहेत. याचा विद्यार्थी व शेतकरी यांना फायदा होणार आहे. तेंव्हा ज्यांना या व्यवसायामध्ये पदार्पण करावयाचे आहे, रेशीम शेती करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाशी संपर्क करावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले आहे. हे चर्चासत्र कौशल्य वाढीसाठी, रोजगार निर्मितीसाठी निश्चितपणे उपयोगी पडेल. असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
.